पंगा क्वीन कंगनावर पुन्हा भडकली स्वरा भास्कर; अभिनयाचं केलं कौतुक पण...

नुकताच शेकरी आंदोलनावरुन झालेला वाद ताजा असतानाच, स्वरा भास्करने (Swara Bhaskar) कंगना रणौतवर (Kangna Ranaut) पुन्हा आगपाखड केली आहे.

नुकताच शेकरी आंदोलनावरुन झालेला वाद ताजा असतानाच, स्वरा भास्करने (Swara Bhaskar) कंगना रणौतवर (Kangna Ranaut) पुन्हा आगपाखड केली आहे.

 • Share this:
  मुंबई, 15 डिसेंबर: अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranaut) आणि स्वरा भास्कर (Swara Bhaskar) यांच्यात नेहमीच कॅटफाईट रंगलेली दिसते. काही दिवसांपूर्वी कंगनाने शेतकरी आंदोलनावरुन (Farmers Protest) वादग्रस्त कॉमेंट केली होती त्याला स्वरा भास्करने तिखट शब्दात उत्तर दिलं होतं. स्वराने पुन्हा एकदा कंगनाचं नाव न घेता तिच्यावर टीका केली आहे. स्वरा भास्करने कंगनाच्या तनु वेड्स मनु या चित्रपटामध्ये काम केलं होतं. पण या दोघींमध्ये सतत वाद रंगलेले असतात. स्वराने कंगनाबद्दल नवं वक्तव्य केलं आहे ती म्हणाली, ‘चांगला कलाकार चांगला माणूस असतोच असं नाही.’ पण हे विधान तिने फक्त कंगनासाठीच केलं आहे असं नाही. स्वरा भास्कर एका लेखकासोबत काम करत असताना तिला त्याचा अतिशय वाईट अनुभव आला होता. तो लेखक अतिशय नावाजलेला आहे. पण तो माणूस म्हणून अतिशय वाईट आहे. असंही स्वरा म्हणाली.
  View this post on Instagram

  A post shared by Swara Bhasker (@reallyswara)

  स्वरा भास्कर पुढे म्हणते, ‘आपण नेहमीच ही चूक करतो की स्क्रीनवर एखादी व्यक्ती चांगली व्यक्तिरेखा साकारत असेल आणि तो त्याच्या कलेत माहिर आहे, तर त्याच्या खऱ्या जीवनातही तसाच असेल. असं आपल्याला वाटतं. वास्तविक जीवनातही असे लोक खूप चांगले लोकं चांगली असतातच असं नाही' की अभिनय हा इतर व्यवसायांसारखा एक व्यवसाय आहे. कंगना रणौत आणि स्वरा भास्कर यांनी अनेकदा एकमेंकीवर आगपाखड केली आहे.
  Published by:Amruta Abhyankar
  First published: