मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Singer KK dies: KK च्या मृत्यूप्रकरणी गुन्हा दाखल; चेहऱ्यावर, डोक्यावर जखमेच्या खुणा

Singer KK dies: KK च्या मृत्यूप्रकरणी गुन्हा दाखल; चेहऱ्यावर, डोक्यावर जखमेच्या खुणा

Singer KK dies: गायक केके यांच्या मृत्यूप्रकरणी न्यू मार्केट पोलीस ठाण्यात (New Market Police Station) अनैसर्गिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Singer KK dies: गायक केके यांच्या मृत्यूप्रकरणी न्यू मार्केट पोलीस ठाण्यात (New Market Police Station) अनैसर्गिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Singer KK dies: गायक केके यांच्या मृत्यूप्रकरणी न्यू मार्केट पोलीस ठाण्यात (New Market Police Station) अनैसर्गिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

  पश्चिम बंगाल, 01 जून: प्रसिद्ध गायक केके यांचं अवघ्या 53 व्या वयात निधन झालं (Famous singer KK has died) आहे. गायक केके यांच्या मृत्यूप्रकरणी न्यू मार्केट पोलीस ठाण्यात (New Market Police Station) अनैसर्गिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस त्यांच्या कुटुंबीयांची वाट पाहत आहेत. त्यांची संमती मिळाल्यानंतर आणि मृतदेहाची ओळख पटवण्याची प्रक्रिया, चौकशी आणि पोस्टमॉर्टम केलं जाणार आहे. एसएसकेएम रुग्णालयात पोस्टमॉर्टमची व्यवस्था करण्यात येत आहे. दुपारनंतर मृतदेह ताब्यात दिला जाईल. केके यांच्या मृत्यूप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. लाईव्ह कॉन्सर्टदरम्यान त्यांची तब्येत बिघडल्याची बातमी आली होती. त्यानंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं होतं. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. पण केकेच्या मृत्यूचे खरे कारण पोस्टमॉर्टमनंतरच सांगता येईल, असे डॉक्टरांनी सांगितले होते. दरम्यान आता केकेच्या चेहऱ्यावर आणि डोक्यावर जखमांच्या खुणा आढळल्याचं वृत्त आहे. केके यांच्या निधनांतर पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. तपास अधिकारी पोस्टमॉर्टमच्या प्राथमिक अहवालाची वाट पाहत आहेत. पोलिसांनी हॉटेलचे सीसीटीव्ही फुटेजही पाहिले. आतापर्यंत पोलीस या प्रकरणाची कार्यवाही अनैसर्गिक मृत्यू प्रकरण म्हणून करत आहेत. केके यांचं लाईव्ह कॉन्सर्ट दरम्यान निधन लाईव्ह कॉन्सर्ट सुरू असताना केके याचा ह्रदयविकाराचा धक्का आला आणि तो जागेवरच कोसळला (Singer KK Died). त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले असता मृत घोषित करण्यात आले आहे. केके च्या मृत्यूमुळे बॉलिवूड शोककळा पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कलकत्त्यातील गुरुदास कॉलेजच्या फेस्टिवलमध्ये ते लाईव्ह शो करीत होते. यादरम्यान त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याचं सांगितलं जात आहे. वयाच्या अवघ्या 53 व्या वर्षी केके यांचं हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला, ही बाब अद्यापही चाहत्यांना पचवणं कठीण झालं आहे. लाईव्ह कॉन्सर्टमधून हॉस्पिटलमध्ये नेतानाचा KK चा Video समोर  सुप्रसिद्ध गायक कृष्णकुमार कुन्नथ याला केके म्हणून ओळखले जात होते. कोलकात्यामध्ये त्याच्या लाईव्ह कॉन्सर्टचे आयोजन करण्यात आले होते. कॉन्सर्ट सुरू असताना अचानक केके खाली कोसळला. त्यामुळे एकच खळबळ उडाली. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. कॉन्सर्ट सुरू असताना केकेला ह्रदयविकाराचा धक्का आला होता. त्यामुळे तो जागेवरच कोसळला होता. वयाच्या 53 व्या वर्षी त्याने अखेरचा श्वास घेतला आहे. केके आपल्या जादुई आवाजासाठी प्रसिद्ध होता. bluetooth च्या जमान्यातल्या या गायकाने बऱ्याच सुपरहिट गाण्यांना प्ले-बॅक दिला आहे. हम रहे या ना रहे कल... पल याद आयेंगे पल या त्यानेच गायलेल्या गाण्याच्या ओळी आज लागू पडत आहेत. त्याच्या शेवटच्या कार्यक्रमाचे अनेक विडिओ त्याच्या फॅन्सनी शेअर केले आहेत. केके याने अनेक चित्रपटांमध्ये गाणी गायली आहे. तडव तडप के, खुदा जाने, अजब सी, तूही मेरा शह है पासून देसी बॉइज, तसं बहाने… अशा पाॅप कल्चरला जवळ जाणाऱ्या अनेक प्रकारच्या गाण्यांना केकेचा आवाज होता. हिंदीशिवाय मराठी, गुजरातील, मल्याळम, बंगाली, तेलुगू, तामिळ, कन्नड गाण्यांनाही त्याने आपला आवाज दिला. ''कायम आठवण ठेवू...'', Singer KK च्या निधनानंतर पंतप्रधान मोदी दु: खी फिल्मसाठी गाणी गाण्यापूर्वी त्याने जवळपास 35000 जिंगल्स गायले आहेत. 1999 सालच्या क्रिकेट वर्ल्ड कपदरम्यान भारतीय टीमसाठी त्याने 'जोश ऑफ इंडिया' गाणं गायलं. पल या म्युझिक अल्बममधून त्याने आपल्या करिअरला सुरुवात केली.
  Published by:Pooja Vichare
  First published:

  Tags: Entertainment

  पुढील बातम्या