S M L

नॅशनल क्रश प्रिया प्रकाश वारियर गाण्यामुळे अडचणीत

या गाण्यामुळे धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करत हैदराबादमधील काही मुस्लिम तरुणांनी प्रिया आणि चित्रपटाच्या निर्मात्याविरोधात तक्रार दाखल केलीय.

Sonali Deshpande | Updated On: Feb 14, 2018 01:13 PM IST

नॅशनल क्रश प्रिया प्रकाश वारियर गाण्यामुळे अडचणीत

14 फेब्रुवारी : आपल्या एका गाण्यामुळे 'इंटरनेट सेन्सेशन' ठरलेली मल्ल्याळम अभिनेत्री प्रिया प्रकाश वारियार अडचणीत सापडलीय. ज्या गाण्यानं प्रियाला रातोरात प्रसिद्धीच्या झोतात आणलं त्याच गाण्यानं संकटाला आमंत्रण दिलंय. या गाण्यामुळे धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करत हैदराबादमधील काही मुस्लिम तरुणांनी प्रिया आणि चित्रपटाच्या निर्मात्याविरोधात तक्रार दाखल केलीय.

हैदराबादमधील काही तरूणांनी गाण्यावर आक्षेप घेत तक्रार दाखल केलीय. 'आम्हीदेखील या गाण्याचे आणि प्रियाचे चाहते झालो होतो. परंतु, हे गाणं मल्ल्याळम भाषेत असल्याने आम्ही त्याचा अर्थ इंटरनेटवर शोधला. त्यानंतर आमच्या लक्षात आले या गाण्यात मोहम्मद पैगंबरांचा आणि त्यांच्या पत्नीचा उल्लेख आहे. एखाद्या रोमॅन्टिक गाण्यासाठी पैगंबरांचा उल्लेख होणं आमच्यासाठी अपमानास्पद आहे' असं मत तक्रारकर्ता मुकिथ खान यानं मांडलं. गाण्यातील शब्दांमुळे धार्मिक भावना दुखावल्यानं त्यानं चित्रपट निर्माते आणि अभिनेत्री प्रिया प्रकाशविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केलीय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 14, 2018 01:10 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

Live TV

News18 Lokmat
close