2 जुलै: बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारच्या 'टॉयलेट'वर कन्टेन्ट चोरीचा आळ लागलाय .हा आरोप प्रवीण व्यास नावाच्या एका डॉक्युमेन्ट्री फिल्ममेकरनं लावलाय.
प्रवीण व्यासच्या 'मानीनी' या पुरस्कार विजेत्या डॉक्युमेन्ट्रीतला कंटेंट टॉयलेटनं चोरल्याचा आरोप त्यानं केलाय .या डॉक्युमेन्ट्रीत एक मुलगी तिच्या सासरी शौचालय नसल्यानं तिथं राहण्यास नकार देते . लग्नानंतर पहिल्याच दिवशी तिचे सासरचे तिला शेतात शौचास घेऊन जातात. असाच काहीसा भाग टॉयलेटमध्येही दाखवला आहे.
टॉयलेटचा स्क्रीनप्ले आणि डायलॉग अगदी मानीनीसारखेच आहेत असं प्रवीण व्यासचं म्हणणं आहे .तसंच त्यांनी कॉपीराइट अॅक्ट अंतर्गत टॉयलेटला नोटिसही पाठवली. टॉयलेटच्या निर्मात्यांनी या आरोपांना काही आधार नसल्याचं सांगितलं आहे .तसंच कोर्टात केस लढायला तयार असल्याचंही त्यांनी प्रवीण व्यासला कळवलंय.
अक्षय कुमार आणि भूमी पेडणेकर या चित्रपटात प्रमुख भूमिकेत आहेत. टॉयलेट 11 अॉगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा