S M L

कोल्हापूरला जाताना आदेश बांदेकरांच्या गाडीला अपघात; बांदेकर 'भावोजी' सुखरूप

महाराष्ट्रातल्या प्रत्येक वहिनीचे लाडके भावोजी अर्थात आदेश बांदेकर यांच्या कारला कराड रोडवर अपघात झाला. सुदैवाने ते या अपघातातून सुखरूप बचावले आहेत.

Renuka Dhaybar | Updated On: Feb 22, 2018 08:09 AM IST

कोल्हापूरला जाताना आदेश बांदेकरांच्या गाडीला अपघात; बांदेकर 'भावोजी' सुखरूप

22 फेब्रुवारी : महाराष्ट्रातल्या प्रत्येक वहिनीचे लाडके भावोजी अर्थात आदेश बांदेकर यांच्या कारला कराड रोडवर अपघात झाला. सुदैवाने ते या अपघातातून सुखरूप बचावले आहेत. कारचा टायर फुटल्यामुळं हा अपघात झाल्याचं समजतं आहे. अशी माहितीच त्यांची पत्नी सुचित्रा बांदेकर यांनी दिली आहे.

कारचा टायर फुटल्यामुळे गाड्या एकमेकांवर आदळल्या आणि अपघात झाला. सूत्रांच्या माहितीनुसार बांदेकर भावोजी सिद्धीविनायक मंदिराच्या वतीने 1 कोटींचा धनादेश जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपुर्द करण्यासाठी जात होते. यावेळी ड्रायव्हरच्या बाजुच्या सिटवरच आदेश बांदेकर बसले होते.

त्यांनी सिटबेल्ट लावले असल्यामुळे त्यांना कोणतीही दुखापत झालेली नाही.

आदेश बांदेकर हे मुंबईतल्या सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष आहेत. चाहत्यांनी काळजी करण्याचे कोणतेही कारण नसून सगळे काही ऑल इज वेल असल्याचं सुचित्रा बांदेकर यांनी सांगितलं आहे.

Loading...
Loading...

आदेश बांदेकर गेल्या 18 ते 19 वर्षापासून झी वाहिनीवरील प्रसिद्ध शो होम मिनिस्टरचे सुत्रसंचालन करत आहेत. तसेच आदेश बांदेकर शिवसेना चित्रपट सेनेचे अध्यक्ष आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 22, 2018 08:09 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close