मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

'आम्ही तिला लग्न करण्यासाठी समजावलं पण..' कॅप्टन विक्रम बत्रांच्या भावाने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा अनुभव

'आम्ही तिला लग्न करण्यासाठी समजावलं पण..' कॅप्टन विक्रम बत्रांच्या भावाने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा अनुभव

विक्रम यांच्या कुटुंबीयांनी देखील चित्रपट पाहून समाधान व्यक्त केलं आहे. तसेच चित्रपट पाहताना त्यांना अश्रू अनावर झाले होते.

विक्रम यांच्या कुटुंबीयांनी देखील चित्रपट पाहून समाधान व्यक्त केलं आहे. तसेच चित्रपट पाहताना त्यांना अश्रू अनावर झाले होते.

विक्रम यांच्या कुटुंबीयांनी देखील चित्रपट पाहून समाधान व्यक्त केलं आहे. तसेच चित्रपट पाहताना त्यांना अश्रू अनावर झाले होते.

  मुंबई 17 ऑगस्ट : कारगिलच्या युद्धात देशासाठी प्राणाची आहुती दिलेल्या परमवीर चक्र प्राप्त कॅप्टन विक्रम बत्रांची (Captain Vikram Batra) जीवनकहाणी ‘शेरशाह’ (Shershaah) चित्रपटात पाहायला मिळत आहे. 12 ऑगस्टला हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांच्या भेटीला आला होता.  पहिल्या दिवसापासूनच चित्रपटाला उत्कृष्ट प्रतिसादही मिळताना दिसत आहे. अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा (Siddharth Malhotra) आणि कियारा अडवाणी (Kiara Advani) चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसत आहेत. कियाराने विक्रम यांची प्रेयसी डिम्पल चीमाची (Dimple Cheema) भूमिका साकारली आहे. विक्रम यांच्या कुटुंबीयांनी देखील चित्रपट पाहून समाधान व्यक्त केलं आहे. तसेच चित्रपट पाहताना त्यांना अश्रू अनावर झाले होते. याचं संदर्भात विक्रम यांचा जुळा भाऊ विशाल बत्राने (Vishal Batra) टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. विशाल यांनी सांगितले की, ‘माझ्या भावाच्या जीवनावर आधारित चित्रपट पाहणं हे खूपच सुखद आहे.’ तसेच त्यांनी सिद्धार्थ आणि कियाराने या भूमिकांना पूर्णपणे न्याय दिला असल्याचंही त्यांनी सांगितलं.
  डिम्पल आणि विक्रम यांच्याविषयी बोलताना ते म्हणाले की, “डिम्पल आणि विक्रम यांचा साखरपुडा झाला नव्हता.  मला फार दुःख होत की काही मीडिया रिपोर्ट्स मध्ये ते एंगेज झाल्याचं लिहिलं जात आहे. मला अशा आहे की हे वाचल्यानंतर पुन्हा ही चूक होणार नाही. काही लोक त्यांचं लग्नं ठरलं होतं व साखरपुडा झालं होता असं लिहितात ते चुकीचं आहे.”
  याशिवाय त्यांनी मीडिया मध्ये डिम्पलचा एक फोटो व्हायरल होत आहे. त्याविषयी देखील खुलासा केला आहे. त्यांनी म्हटलं की, “मी स्पष्टपणे सांगतो की, हा जो डिम्पलचा फोटो आहे असं सांगितलं जातं आहे, व एका ग्रुप सोबत ती माझ्या भावासोबत उभी आहे, ती डिम्पल नाही तर विक्रम ची एक वर्गंमैत्रीण आहे.”

  अखेर शिल्पा शेट्टीची 'सुपर डान्सर'मध्ये वापसी; Raj Kundra प्रकरणानंतर टीव्हीवर पुन्हा दिसणार अभिनेत्री

  डिम्पलच्या लग्नाविषयी प्रश्न विचारला असता त्यांनी सांगितलं की, “मी तिला पुढे लग्न करण्यासाठी सांगितल होतं. मीच नाही तर माझ्या आई बाबांनी देखील तिला समजावलं.” दरम्यान डिम्पल चीमा या आजही अविवाहित आहेत. विक्रम बत्रा यांच्या निधनानंतर त्यांनी लग्न न करण्याचा निर्णय घेतला होता. चित्रपटाच्या चित्रीकरणापूर्वी कियारा डिम्पल यांना भेटली होती. दिल्लीत विशाल यांनी त्यांची भेट घडवून आणली होती. तेव्हा त्या दोघींनी जवळपास 3 ते 4 तास चर्चा केल्याचं ही त्यांनी सांगितलं. याशिवाय विक्रम यांच्या अंत्यविधीच शुटींग हे त्याचं ठिकाणी करण्यात आलं, ज्या ठिकाणी त्यांचे खरेखुरे अंत्यविधी झाले होते. यासाठी विशाल यांनी मदत केली होती.
  Published by:News Digital
  First published:

  Tags: Bollywood, Entertainment, Sidharth Malhotra

  पुढील बातम्या