Home /News /entertainment /

Vikram Batra Biopic: देशासाठी बलिदान दिलेल्या 'शेरशाह'ची प्रेमकहाणी आणेल डोळ्यात पाणी; प्रेयसी आजही विक्रमच्या प्रतीक्षेत

Vikram Batra Biopic: देशासाठी बलिदान दिलेल्या 'शेरशाह'ची प्रेमकहाणी आणेल डोळ्यात पाणी; प्रेयसी आजही विक्रमच्या प्रतीक्षेत

शहीद कॅप्टन विक्रम बत्रा आणि डिंपल चीमाची प्रेमकहानी केवळ इमोशनलच नाही तर खऱ्या प्रेमाची आठवण करूण देणारी ठरली आहे.

  मुंबई 13 ऑगस्ट : परमवीरचक्र सम्मानित शहीद कॅप्टन विक्रम बत्रा (Captain Vikram Batra) यांच्या जीवनावर आधारित सिद्धार्थ मल्होत्रा (Sidharth Malhotra) आणि कियारा अडवाणी (Kiara Advani) स्टारर ‘शेरशाह (Shershaah)’ चित्रपट नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. चित्रपटात अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा कारगिल युद्धाच्या नायकाच्या भूमिकेत दिसत आहे. तर कियारा अडवाणी चित्रपटात विक्रम बत्रा यांची प्रेयसी डिंपल चीमाच्या (Dimple Cheema) भूमिकेत दिसत आहे, जिने कॅप्टन विक्रम बत्रांच्या आयुष्यात महत्त्वाची भूमिका साकारली होती. शहीद कॅप्टन विक्रम बत्रा आणि डिंपल चीमाची प्रेमकहानी केवळ इमोशनलच नाही तर खऱ्या प्रेमाची आठवण करूण देणारी ठरली आहे. हीच कहानी ‘शेरशाह’ चित्रपटात देखील पाहायला मिळत आहे. 12 ऑगस्टला चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. तर पहिल्याच दिवशी चित्रपटाला उत्तम प्रतिसाद मिळताना दिसत आहे.
  एक मुलाखतीत कियाराने सांगतिलं की, ‘डिंपल चीमा माझ्यासाठी गुमनाम नायिका आहे. जिने आपल्या प्रेमाची लढाई लढली देखील आणि आलेल्या प्रत्येक संकटाचा ठामपणे सामना केला.’ डिम्पल आणि विक्रम यांची कहानीच अशी डोळ्यात पाणी आणणारी आहे.
  कॅप्टन विक्रम बत्रा आणि डिम्पल यांचं एकमेकांवर जीवापाड प्रेम होतं. ते लग्नंही करणार होते. पण 1999 साली कारगीलच्या युद्धाची घोषणा झाली आणि विक्रम बत्रा सीमेवर परतले. पण देशासाठी जीवाची बाजी लावताना ते शहिद झाले. यानंतर डिम्पलने कधीही लग्न न करण्याची शपथ घेतली. तर आजही ती आपल्या प्रेमासाठीच जगते. त्यामुळेच विक्रम आणि डिम्पलची कहानी अनेकांसाठी प्रेरणा बनली आहे. दरम्यान अभिनेत्री कियारा अडवाणी चित्रपटाच्या चित्रिकरणापूर्वी डिम्पलला भेटली होती. तिने विक्रम आणि तिच्या लव्हस्टोरीविषयी बरीच माहिती कियाराला सांगितली होती.
  Published by:News Digital
  First published:

  Tags: Bollywood actor, Entertainment, Sidharth Malhotra

  पुढील बातम्या