Home /News /entertainment /

'Cannes' साठी निवडलेल्या ‘पोटरा’तील छकुलीच्या मदतीसाठी धावून आले अमित देशमुख, केली 'इतक्या रुपयांची' मदत

'Cannes' साठी निवडलेल्या ‘पोटरा’तील छकुलीच्या मदतीसाठी धावून आले अमित देशमुख, केली 'इतक्या रुपयांची' मदत

छकुली ही सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील आष्टी या गावची रहिवाशी आहे. तिच्या घरची परिस्थिती अतिशय बिकट आहे.

    मुंबई, 17 मे- यंदाच्या कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट  महोत्सवासाठी (  Cannes film festival 2022 ) निवड झालेल्या ‘पोटरा’ ( potara ) या चित्रपटातील कलाकार छकुली देवकर  (chhakuli ) हिच्या घरच्या हलाखीच्या परिस्थितीची माहिती कळताच तिला आर्थिक सहाय्य देण्याचा निर्णय सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी घेतला होता. त्यानुसार छकुलीला तात्काळ एक लाख रुपयाचा धनादेश देण्यात येणार असल्याची घोषणा चित्रनगरीचे व्यवस्थापकीय संचालक विवेक भिमनवार यांनी केली आहे. ‘पोटरा’ या चित्रपटातील कलाकार छकुली प्रल्हाद देवकर (15 ) हिचा ‘पोटरा’ हा पहिला चित्रपट आहे. यापूर्वी तिने कोणत्याही चित्रपट अथवा नाटकात भूमिका केलेली नाही. तिला पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव-२०२२ मध्ये उत्कृष्ट कलाकार म्हणून सन्मानित करण्यात आले आहे. वाचा-'आज तू जाऊन 2 वर्षे झाली..' अभिनेता हार्दिक जोशी आजही या खास मित्राला करतो मिस छकुली ही सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील आष्टी या गावची रहिवाशी आहे. तिच्या घरची परिस्थिती अतिशय बिकट आहे. तिच्या कुटुंबियांना राहण्यासाठी स्वतःचे घर नसून ती गावातील एका झोपडीत आई-वडिलांसह राहते. तिचे वडील आजारी असून ते अंथरुणावर पडून असतात. तर आई ही मोलमजुरी करते, अशी माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांना मिळाली होती. त्यानंतर त्यांनी छकुलीला तात्काळ आर्थिक मदत देऊन तिच्यातील कलागुणांना विकसित करण्यासाठी पुढील शिक्षणाचे नियोजन करण्याचे निर्देश चित्रनगरी प्रशासनाला दिले होते. सांस्कृतिक कार्यमंत्र्यांच्या निर्देशानंतर चित्रनगरी प्रशासनाने तात्काळ पावले उचलत छकुलीला एक लाख रुपयांचा धनादेश दिला आहे.
    Published by:News18 Trending Desk
    First published:

    Tags: Entertainment, Marathi entertainment

    पुढील बातम्या