Cannes 2019 : दीपिका पादुकोणची रेड कार्पेटवर धमाकेदार एंट्री, पाहा तिचा यंदाचा लुक

Cannes 2019 : दीपिका पादुकोणची रेड कार्पेटवर धमाकेदार एंट्री, पाहा तिचा यंदाचा लुक

कान्स फिल्म फेस्टिव्हल 2019साठी दीपिकाने विशेष मेहनत घेतली असून तिनं याच्या तयारीसाठी जिममध्ये खूप घामही गाळला आहे.

  • Share this:

मुंबई, 16 मे : बॉलिवूड क्वीन कंगना रनौत, टीव्ही अभिनेत्री हिना खाननंतर आता बॉलिवूडची मस्तानी दीपिका पदकोणनं कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या रेड कार्पेटवर दिमाखदार अंदाजात एंट्री केली. दीपिका मागच्या 2 वर्षांपासून या फेस्टिव्हलमध्ये सहभागी होत असून यंदाचं हे तिचं तिसरं वर्ष आहे. मागील दोन वर्षांपेक्षा यंदा दीपिका काहीशा हटके अवतारात कानमध्ये सहभागी झाली. रणवीर सिंहशी लग्नगाठ बांधल्यावर दीपिका यंदा पहिल्यांदाच रेड कार्पेटवर उतरणार असल्यानं तिच्या यंदाच्या लुककडे सर्वांच्या नजरा लागून राहिल्या होत्या.

दीपिकानं कान 2019साठी ऑफ व्हाइट कलरच्या डीप नेक गाऊनची निवड केली आहे. यावर मोठे डायमंड इयरिंग्स कॅरी केले असून हाय पोनीटेल मध्ये दीपिका खूपच सुंदर दिसत आहे. कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये दीपिका 'लॉरियल' कंपनीची अ‍ॅम्बेसिडर म्हणून हजेरी लावणार आहे.




 





View this post on Instagram




 

Taaaaddaaaaa!!! #Cannes2019 @lorealmakeup @lorealhair @lorealskin


A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone) on





कान फेस्टिव्हलच्या अगोदर दीपिकानं मेट गालाच्या पिंक कार्पेटवर हजेरी लावली होती. तिचा हा लुकही सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. तिच्या मेट गाला लुकचं सर्वत्र खूप कौतुकही झालं होतं. त्यानंतर कानसाठी तिने विशेष मेहनत घेतली असून तिनं कानच्या तयारीसाठी जिममध्ये खूप घामही गाळला होता.




 





View this post on Instagram




 

close up to banta hai...!#Cannes2019 @lorealmakeup @lorealhair @lorealskin


A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone) on





दीपिका सध्या मेघना गुलजारच्या 'छपाक' सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. पण मेट गाला आमि कान्स फिल्म फेस्टिव्हलसाठी तिनं शूटिंगमधून काही दिवसांचा ब्रेक घेतला आहे. या सिनेमात ती दिल्लीची अ‍ॅसिड हल्ला पिडित लक्ष्मी अग्रवालची व्यक्तिरेखा साकारत आहे.


डेस्टिनेशन वेडिंगचं लोकेशन ठरवण्यासाठी युरोपला गेले होते रणबीर-आलिया ?


दुसऱ्या बाईकडे पाहताना अजय देवगण जेव्हा बायकोकडूनच पकडला जातो...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 16, 2019 11:01 PM IST

ताज्या बातम्या