मुंबई, 15 ऑगस्ट : एकीकडे संपूर्ण देश आज स्वातंत्र्य दिनाचा (74th Independance Day) सोहळा साजरा करत आहे. तर दुसरीकडे सोशल मीडियावर जगभरातून दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्याकरता प्रार्थना केली जात आहे. यावेळी सोशल मीडियावर #GlobalPrayersForSSR हा हॅशटॅग देखील ट्रेंड होत आहे. सुशांतच्या मृत्यूची चौकशी सीबीआयमार्फत व्हावी अशी मागणी सोशल मीडियावर जोर धरू लागली आहे. दरम्यान सुशांतच्या मोठ्या बहिणीने दिलेल्या माहितीनुसार, कॅलिफोर्निया स्टेट असेंबलीकडून (California Legislature Assembly) सुशांत सिंह राजपूतचा खास सन्मान देखील करण्यात आला आहे. त्याची बहिण श्वेता सिंह किर्ती हिने हा पुरस्कार त्याच्या वतीने घेतला आहे. तिने सोशल मीडियावर पोस्ट करत याबाबतची माहिती दिली आहे.
श्वेता सिंह किर्तीने दिलेल्या माहितीनुसार, 'आज स्वातंत्र्य दिनाच्या प्रसंगी कॅलिफोर्नियाने माझ्या भावाचे (सुशांतचे) समाजातील योगदान ओळखले आहे. कॅलिफॉर्निया आमच्याबरोबर आहे, काय तुम्ही आमच्या बरोबर आहात का? कॅलिफोर्निया तुमच्या पाठिंब्यासाठी धन्यवाद. #GlobalPrayersForSSR #Warriors4SSR #CBIForSSR #Godiswithus'
सुशांतची बहिण श्वेता सिंह किर्तीने (Shweta Singh Kirti) स्वातंत्रदिनाच्या दिवशी एकत्र येण्याचे आणि सामुहिक स्वरुपात दिवंगत अभिनेत्यासाठी प्रार्थना (Global Prayers For SSR) करण्याचे आवाहन केले होते. सुशांतच्या बहिणीसह त्याच्या लाखो चाहत्यांनी त्याच्यासाठी प्रार्थना केली.
(हे वाचा-सुशांतसाठी केली जातेय जगभरातून प्रार्थना, #GlobalPrayersForSSR ट्विटरवर ट्रेंड)
सकाळी 10 वाजल्यापासून अनेकांनी सुशांतच्या आत्म्याच्या शांतीसाठी हात जोडून फोटो पोस्ट केले आहेत. यावेळी ट्विटर वर #GlobalPrayersForSSR ट्रेंड करत आहे. यानंतर श्वेताने एक व्हिडीओ देखील पोस्ट केला आहे ज्यात राजपूत कुटुंबीय सुशांतच्या फोटोसमोर बसून प्रार्थना करताना दिसत आहेत.
सुशांतच्या मृत्यूला 2 महिने उलटून गेले आहेत. तरी अद्याप त्याने हे टोकाचे पाऊल का उचलले याचा तपास केला जात आहे. याप्रकरणी सुरुवातीला मुंबई पोलिसांकडून तपास सुरू होता. त्यानंतर त्याच्या वडिलांनी पाटणा पोलिसात एफआयआर दाखल केल्यानंतर बिहार पोलिसांनी देखील तपासासाठी मुंबई गाठली होती. याप्रकरणी सीबीआयमध्ये आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. यामध्ये मुख्य आरोप असणारी सुशांतची एक्स गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीने सर्वोच्च न्यायालयाचे दार ठोठावले आहे. सीबीआय चौकशीची मागणी करणाऱ्या रियाने सर्वोच्च न्यायालयात याचाच विरोध केला आहे.
(हे वाचा-'सुशांत नाही तर मीच भरते माझ्या घराचे हप्ते', अंकिताने शेअर केलं बँक स्टेटमेंट)
दरम्यान सुशांतच्या बहिणीबरोबरच कंगना रणौत, त्याची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडे, क्रिती सॅनन, वरुण धवन, परिणीती चौप्रा, सिद्धार्थ चतुर्वेदी, मौनी रॉय, जरीन खान, शेखर कपूर इ. या कलाकारांनी देखील सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात सीबीआय चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे.