CAA : रंगोली चंडेलच्या निशाण्यावर महेश भट, मुलीसोबत लिपलॉक KISS चा फोटो केला पोस्ट

CAA : रंगोली चंडेलच्या निशाण्यावर महेश भट, मुलीसोबत लिपलॉक KISS चा फोटो केला पोस्ट

बॉलिवूडमधील नेपोटिझमवर बोलणारी कंगानाची बहिण रंगोली चंडेलनं आता निर्माता आणि दिग्दर्शक महेश भट यांच्यावर निशाणा साधला आहे.

  • Share this:

मुंबई, 20 डिसेंबर : नेहमीच काही ना काही कारणानं वादाच्या भोवऱ्यात सापडणारी अभिनेत्री कंगना रणौतची बहिण सुद्धा सोशल मीडियावर काही ना काही कारणानं चर्चेत राहतेच. बॉलिवूडमधील नेपोटिझमवर बोलणारी कंगानाची बहिण रंगोली चंडेलनं आता निर्माता आणि दिग्दर्शक महेश भट यांच्यावर निशाणा साधला आहे. महेश भट यांनी CAA बद्दल नुकतंच एक ट्वीट करत आवाज उठवला होता. त्यांनंतर त्यांच्या याच ट्वीटचा आधार घेत रंगोलीनं त्यांच्यावर टीका केली आहे.

रंगोली चंडेलनं तिच्या ट्विटरवर एक पोस्ट करत महेश भट यांच्यावर टीका केली आहे. एवढंच नाही तर काही वर्षांपूर्वीचा त्याच्या मुलीसोबतचा लिपलॉक किस करतानाचा एक फोटो पोस्ट करत तिनं CAA वर बोलणाऱ्या महेश भट यांनी देशासाठी काय केले आहे असा प्रश्नही तिनं उपस्थित केला आहे. रंगोलीनं लिहिल, ‘भट साहब, पुस्तक वाचून आपण फक्त मोठ्या गोष्टी बोलू शकतो. मोठं होऊ शकत नाही. तरुण मुलीला मांडीवर बसवून तिच्यासोबत फोटो काढता. व्यक्ती त्याच्या कर्मांनं मोठी होते. तुम्ही देशासाठी काय केलं आहे. तुमचं हे ढोंगी स्वतंत्र्य आता चालणार नाही.’

अनिल कपूरच्या हॅन्डसम आणि आनंदी दिसण्याचं 'हे' आहे गुपित!

महेश भट यांनी देशासाठी काय केलं आहे किंवा काय योगदान दिलं आहे असा प्रश्न करतानाच रंगोलीनं महेश भट आणि पूजा भट यांचा एक जुना फोटो शेअर केला आहे. ज्यात हे दोघंही लिपलॉक किस करताना दिसत आहेत.

या फोटोवरुन या आधीही बरेच वाद झाले आहेत. हा फोटो कोणालाच आवडला नव्हता आणि अनेक लोकांनी महेश भट यांच्यावर टीका केली होती.

'छपाक' ट्रेलर रिलीजनंतर नाराज आहे लक्ष्मी अग्रवाल?

रंगोल चंडेलच्या या ट्वीटवर अनेक लोक कमेंट करताना दिसत आहेत. अनेकांनी रंगोलीला पाठिंबा दिला असून तुम्ही बरोबर बोलत आहात असं अनेक युजर्सनी म्हटलं आहे. तर दुसरीकडे महेश भट सोशल मीडियावर पुन्हा एकदा ट्रोल होताना दिसत आहेत.

एका युजरनं लिहिलं, या लोकांमध्ये काहीही चालतं. आणखी एका युजरनं लिहिलं, हा फोटो तर फॅमिली शोमध्ये दाखवायला हवा. तर काहींनी लिहिलं, रंगोलीनं पहिल्याच काहीतरी पटण्यासारखी गोष्ट बोलली आहे. तिनं बोललेलं सर्व खरं आहे.

टॉप 5 मध्ये पुन्हा एकदा Zee Marathi, पाहा कोणती मालिका आहे नंबर वन!

Published by: Megha Jethe
First published: December 20, 2019, 11:32 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading