VIDEO: डान्स करताना अचानक आला आवाज आणि खटकन मोडलं अभिनेत्रीच्या पायचं हाड

VIDEO: डान्स करताना अचानक आला आवाज आणि खटकन मोडलं अभिनेत्रीच्या पायचं हाड

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये हाड मोडल्याचा आवाज स्पष्ट ऐकू येत आहे...

  • Share this:

मुंबई, 29 फेब्रुवारी : हॉलिवूड सिंगर आणि अभिनेत्री ब्रिटनी स्पीअर्सचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये ब्रिटनी जास्तच उत्साहात डान्स करताना दिसत आहे. पण सोशल मीडियावर तिचा हा व्हिडीओ व्हायरल होण्याचं कारण काही वेगळंच आहे.

ब्रिटनी स्पीयर्सनं 27 फेब्रुवारीला एक व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. ज्यात ती डान्स करताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये ती उड्या मारत डान्स करत आहे. पण डान्स करता करता अचानक तिचा तोल जातो आणि जोरात आवाज येऊन तिच्या पायाचा हाड मोडतं. हा व्हिडीओ शेअर करताना तिनं लिहिलं, मी 6 महिने डान्स केला नव्हता म्हणून एवढ्या उत्साहात डान्स करत होते. मला माहित होतं की मी पायात शूज घातले नाही, पण ते न घालताच मला जास्त चांगली ग्रिप मिळते. पण तुम्हाला समजलंच असेल की यात माझ्या पायाचं हाड मोडलं. सॉरी आवाज जरा जास्तच आला.

Bigg Boss 13 फेम पारस-माहिरा अडकले लग्नाच्या बेडीत? काय आहे Viral Photos चं सत्य

ब्रिटनीचं खरं नाव ब्रिटनी जीन स्पीयर्स आहे. ती हॉलिवूडची प्रसिद्ध गायिका आहे. तिनं तिच्या करिअरची सुरुवात 1992 मध्ये 'स्टार सर्च' प्रोग्रामची स्पर्धक म्हणून केली होती. यानंतर 1993 ते 1994 मध्ये ती डिज्ने चॅनेलच्या 'द न्यू मिकी माऊस क्लब' या शोमध्ये दिसली होती. ब्रिटनी सोशल मीडियावर खूप सक्रीय आहे. ती नेहमीच तिचे सिंगिंग आणि योगाचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते.

पार्टी करून परतत होती जान्हवी; फोटोग्राफर म्हणाला, ‘आप कहो तो घर तक भी आएंगे’

 

View this post on Instagram

 

🌹☕️ 🌹

A post shared by Britney Spears (@britneyspears) on

ब्रिटनीनं तिचा ‘बेबी वन मोअर टाइम’ हा पहिला अल्बम 1999 मध्ये रिलीज केला होता. त्यानंतर 2000 मध्ये तिचा ‘उप्स… आय डीड इट अगेन’ हा अल्बम रिलीज केला. तिचा हा अल्बम खूप हिट झाला आणि हळूहळू ती हॉलिवूडची प्रसिद्ध गायिका झाली.

घटस्फोटानंतर आता असं आयुष्य जगतायत बॉलिवूडच्या सुपरहिट अभिनेत्री

First published: February 29, 2020, 12:29 PM IST

ताज्या बातम्या