Elec-widget

जस्टिन बिबरनंतर आता येतोय ब्रिटिश पाॅप सिंगर शीरन

जस्टिन बिबरनंतर आता येतोय ब्रिटिश पाॅप सिंगर शीरन

१९ नोव्हेंबरला शीरन मुंबईत असणारेय.

  • Share this:

11 मे : नुकत्याच मुंबईत झालेल्या जस्टिन बिबरच्या कॉन्सर्टला प्रचंड मोठा प्रतिसाद मिळालाय. आणि आता आणखी एक जगप्रसिध्द गायक भारतात कॉन्सर्ट करणार असल्याचं  कळतंय. जगभरातील तरूणांच्या मनावर मोहिनी घालणारा ब्रिटिश पॉप सिंगर एड शीरन भारतात येणारेय.

१९ नोव्हेंबरला शीरन मुंबईत असणारेय. याची घोषणा त्याच्या अधिकृत वेबसाइटवरून www.edsheeran.com  करण्यात आलीय. परंतु त्याचा हा कॉन्सर्ट नक्की कुठे होणार, हे मात्र अद्याप कळू शकलेलं नाहीये. महत्त्वाची गोष्ट म्हणजे १० मे रोजी जस्टिन बिबर हा दुसरा एक लोकप्रिय पॉपस्टार भारतात आलेला असतानाच ही घोषणा करण्यात आलीय.

एड शीरन हा जगातील सर्वांत लोकप्रिय गायकांमधील एक आहे.  मार्चमध्ये आलेला 'डिव्हाइड' हा त्याचा तिसरा अल्बम खूपच हिट झालेला. याच अल्बममधील 'शेप ऑफ यू' आणि 'कॅसल ऑन द हिल' या गाण्यांनी तर तरूणाईला अक्षरशः वेड लावलेलं. 'शेप ऑफ यू' हे गाणं तर बराच काळ जगभरात अव्वल स्थानी राहिलं होतं. भारतातही हे गाणं प्रचंड लोकप्रिय ठरलेलं. आणि म्हणूनच तर या गाण्याची अनेक व्हर्जन भारतात तयार केली गेलेली.

यावरूनच शीरनच्या भारतातील लोकप्रियतेचा अंदाज येतोय. आता शीरनचा भारतात कॉन्सर्ट होणार असल्याची बातमी कळताच त्याच्या चाहत्यांनी जल्लोष केलाय.

Loading...

शीरनचा भारतातील कॉन्सर्ट जस्टिन बिबरप्रमाणेच यशस्वी ठरतो का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणारेय.

याशिवाय शीरन यावर्षभरात मुंबईसह जगभरातील विविध 9 शहरांमध्ये कॉन्सर्ट करणारंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 11, 2017 05:17 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...