मुंबई 10 सप्टेंबर : अभिनेत्री केतकी चितळे (Ketaki Chitale) आणि विवाद हे समीकरण आता नवं नाही. अनेकदा वादग्रस्त वक्तव्यांमुळे ती चर्चेत राहते. तर अनेकदा तिच्या सोशल मीडिया पोस्टही विवादीत ठरतात. एपिलिप्सी क्वीन (Epilepsy queen) म्हणून प्रसिद्ध असलेली केतकी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तर यावेळी ती केवळ वादग्रस्त विधानांत अडकली नाही तर तिच्यावर गुन्हाही नोंदवण्यात आला आहे.
दरम्यान मगील वर्षी मार्च महिन्यातच हे प्रकरण सुरू झालं होतं. जेव्हा केतकीने एक वादग्रस्त पोस्ट केली होती. तर यासंधर्भात आता ठाणे कोर्टाने तिचा अटकपूर्व जामीन फेटाळला आहे. त्यामुळे आता केतकी चितळेच्या अडचणीत वाढ झाली आहे.
View this post on Instagram
सोशल मीडियावर सक्रिय असणारी केतकी नेहमीच निरनिराळ्या पोस्ट करत असते. अनेकदा तिच्यावर टीकाही केली जाते. मात्र ती कधीही याकडे लक्ष देत नाही. मात्र केतकी चितळे हिने 1 मार्च 2020 रोजी आक्षेपार्ह पोस्ट सोशल मीडियावर पोस्ट केली होती. ज्यामुळे तिच्यावर टीकाही झाली होती.
View this post on Instagram
याच संधर्भात 3 मार्च 2020 रोजी वकील स्वप्नील जगताप यांनी नवी मुंबई (Navi Mumbai) येथील रबाळे पोलिस ठाण्यात केतकी चितळे व सुरज शिंदे विरुद्ध जाती व जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर केतकीने अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता. मात्र कोर्टानो आता केतकीचा अर्ज फेटाळला आहे. ठाणे कोर्टाने (Thane Court) केतकीला हा मोठा धक्का दिला आहे. त्यामुळे आता केतकीच्या अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.