मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Breaking: बॉम्बे हायकोर्टाचा कंगनाला दणका, सुशांत सिंह प्रकरणातील ती याचिका फेटाळली

Breaking: बॉम्बे हायकोर्टाचा कंगनाला दणका, सुशांत सिंह प्रकरणातील ती याचिका फेटाळली

जावेद अख्तर (Javed Akhtar) यांच्या तक्रारीनंतर कंगानाने ही केस रद्द करण्याची मागणी 1 सप्टेंबरला केली होती. त्यानंतर आता कोर्टाने ही याचिका फेटाळली आहे.

  • Published by:  News Digital

मुंबई 9 सप्टेंबर : अभिनेत्री कंगना राणौत (Kangana Ranaut) पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.  तर मुंबई हाय कोर्टाने (Bombay High Court) पुन्हा कंगनाला धारेवर धरल्याचं पाहायला मिळत आहे. बुधवारी मुंबई हाय कोर्टाने कंगनाने दिलेली याचिका फेटाळली आहे. जावेद अख्तर (Javed Akhtar) यांच्या तक्रारीनंतर कंगानाने ही केस रद्द करण्याची मागणी 1 सप्टेंबरला केली होती. त्यानंतर आता कोर्टाने ही याचिका फेटाळली आहे.

दरम्यान सुशांत सिंग राजपूत (Sushant Singh Rajput) प्रकरणानंतर कंगना फारच चर्चेत होती. बॉलिवूडसह अनेकांवर तिने आरोप केले होते. तर जावेद अख्तर यांच्यावरही तिने आरोप केले होते. त्यानंतर अख्तर यांनी कोर्टात धाव घेतली होती. जावेद अख्तर यांनी कंगानवर सुशांत सिंग राजपूत प्रकरणात ओढून त्यांची प्रतिमा मलिन केल्याचा आरोप केला होता. रिपब्लिक टीव्ही ला 2020 मध्ये दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी म्हटलं होतं.

तर कंगनाने तिच्या याचिकेत म्हटलं होतं की,  section 482 CrPC अंतर्गत तिच्यावर लावलेले आरोप रद्द करण्याची मागणी केली होती. कंगनाचा वकील रिझवान सिद्धीकीने कंगनाची ही याचिका दाखल केली होती.

दरम्यान सुशांत सिग राजपूत मृत्यू प्रकरणानंतर कंगनाने अनेकांशी पंगा घेतला होता. तसेच तिने बीएमसीशी देखील वाद निर्माण केला होता. त्यानंतर तिच्या ऑफिसचा काही भाग तोडण्यात देखील आला होता. तर आता पुन्हा एकदा कोर्टाने तिची याचिका फेटाळत तिला दणका दिला आहे.

कंगना सध्या तिच्या थलायवी चित्रपटामुळे चर्चेत आहे. लवकरच तिचा हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यांच जोरदार प्रमोशन सुरू आहे. इतकच नाही तर कंगानाने सोशल मीडियावर तिचं नावही बदललं आहे. ज्यात तिने कंगना थलायवी असं लिहिलं.

First published:

Tags: Bollywood, Entertainment, Kangana ranaut