Home /News /entertainment /

महानायक हरपला, दिग्गज अभिनेते दिलीपकुमार यांचं निधन

महानायक हरपला, दिग्गज अभिनेते दिलीपकुमार यांचं निधन

दिग्गज अभिनेते मोहमद युसूफ खान उर्फ दिलीपकुमार (Tragedy King DilipKumar) यांचं निधन झालं आहे. ते 98 वर्षांचे होते.

  मुंबई, 07 जुलै : हिंदी चित्रपटसृस्ष्टीतील ट्रॅजिडी किंग दिग्गज अभिनेते मोहमद युसूफ खान उर्फ दिलीपकुमार (Tragedy King DilipKumar) यांचं निधन झालं आहे. ते 98 वर्षांचे होते. दिलीप कुमार यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने, त्यांना मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात (Hinduja Hospital in Mumbai) दाखल करण्यात आलं होतं. अखेर उपचारादरम्यान, त्यांनी आज पहाटे अखेरचा श्वास घेतला. काही दिवसांपूर्वी दिलीप कुमार यांना श्वास घेण्यास अडचण येत असल्याने त्यांना रुग्नायालयात दाखल करण्यात आलं होतं. रुग्णालयात दाखल केल्यापासून त्यांचे चाहते आणि संपूर्ण बॉलिवूड त्यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करत होते. पण, आज पहाटे उपचार सुरू असताना दिलीप कुमार यांनी जगाचा निरोप घेतला. दिलीप कुमार यांच्या निधनामुळे बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. दिलीप कुमार यांनी 1940-70 अशी जवळपास तब्बल तीन दशकं त्यांनी आपल्या जबरदस्त अभिनयाच्या जोरावर गाजवली.  1944 मध्ये आलेल्या ‘ज्वार भाटा’ या चित्रपटातून त्यांनी आपल्या अभिनयास सुरुवात केली होती. मात्र हा चित्रपट अपयशी ठरला होता. त्यानंतर आलेला ‘मिलन’ हा त्यांचा चित्रपट सुपरहिट ठरला होता. आणि त्यानंतर त्यांनी कधीचं मागे वळून पहिलं नाही. त्यांना बॉलिवूडमधील ‘ट्रॅजेडी किंग’ म्हणून ओळखलं जायचे. आज भारतीय सिनेसृष्टीतील अनेक नामांकित कलाकार त्यांनी आपला आदर्श मानतात. अनेक कलाकारांनी तर त्यांची नक्कल करुन बॉलिवूडमध्ये काम करण्यास सुरुवात केली होती. इतका लोकप्रिय असलेला हा अभिनेत्याने वयाच्या 98 व्या वर्षापर्यंत आजाराशी लढा दिला. वयोमानामुळं गेल्या काही काळात अनेकदा त्यांची तब्येत बिघडली होती. शिवाय दिलीप कुमार यांचे भाऊ असलम आणि एहसान खान यांचे गेल्या वर्षी करोनाच्या संक्रमणाने निधन झाले होते.

  तुमच्या शहरातून (मुंबई)

  Published by:sachin Salve
  First published:

  Tags: Dilip kumar

  पुढील बातम्या