BREAKING: अभिनेत्रींनंतर आता प्रसिद्ध बॉलिवूड दिग्दर्शक-निर्माते NCBच्या रडारवर, रात्रभर सुरू आहे छापेमारी

BREAKING: अभिनेत्रींनंतर आता प्रसिद्ध बॉलिवूड दिग्दर्शक-निर्माते NCBच्या रडारवर, रात्रभर सुरू आहे छापेमारी

ड्रग प्रकरणी (Drug Case) बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रींची चौकशी झाल्यानंतर आता एनसीबीच्या रडावर बॉलिवूडमधील काही प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माते आहेत

  • Share this:

मुंबई, 08 नोव्हेंबर: बॉलिवूडमधील (Bollywood) ड्रग प्रकरणाची पाळमुळं धुंडाळण्याचे काम सध्या नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून (NCB) सुरू आहे. याप्रकरणी बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रींची चौकशी झाल्यानंतर आता एनसीबीच्या रडावर बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माते आहे. हे निर्माते आणि दिग्दर्शकांकडे एनसीबीच्या छापेमारीस सुरूवात झाली आहे. मिळालेल्या माहितीसुसार शनिवारी रात्रभर ही छापेमारी सुरू होती असून यामध्ये काही प्रमाणात अंमली पदार्थ देखील जप्त करण्यात आले आहेत. मुंबईतील विविध भागांमध्ये ही छापेमारी सुरू आहे. यामध्ये बॉलिवूडमधील मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता आहे.

मुंबईतील लोखंडवाला, मालाड, अंधेरी आणि नवी मुंबई परिसरात ही छापेमारी करण्यात आली आहे. दरम्यान एनसीबीने या निर्माते आणि दिग्दर्शकांची नावं उघड करण्यास नकार दिला आहे.  सूत्रांच्या माहितीनुसार या निर्माते आणि दिग्दर्शकांच्या घरातून काही प्रमाणात अंमली पदार्थ देखील जप्त केले आहेत, शनिवारी रात्रीपासून सुरू असलेली छापेमारी अद्यापही सुरू आहे.

(हे वाचा-शोविक चक्रवर्तीने तिसऱ्यांदा दाखल केली जामीन याचिका, SCच्या निर्णयाचा दिला हवाला)

एनसीबीने आतापर्यंत केलेल्या कारवाईत काही ड्रग पेडलर्सना अटक केली आहे. त्यांच्या चौकशीतून काही नावं समोर आली आहेत. त्या नावांच्या आधारेच एनसीबीने ही छापेमारी केली आहे. या पेडलर्सच्या जबाबाच्या आधारे अद्याप एनसीबीकडून कारवाई सुरू आहे.

(हे वाचा-NUDE फोटोमुळे मिलिंद सोमणवर FIR दाखल झाल्यानंतर व्हायरल होत आहेत हे PHOTOS)

अभिनेत्री दीपिका पादूकोण (Deepika Padukone), श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor), रकुल प्रीत सिंग(Rakul Preet Singh), सारा अली खान (Sara Ali Khan) यांची नावं ड्रग केसमध्ये समोर आल्यानंतर आता निर्माते-दिग्दर्शकांपैकी कुणाचे नाव समोर येते हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput Death Case) मृत्यू प्रकरणाच्या चौकशीत समोर आलेल्या ड्रग कनेक्शनमध्ये या अभिनेत्रींची चौकशी करण्यात आली होती.

Published by: Janhavi Bhatkar
First published: November 8, 2020, 11:29 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading