• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • 'बिग बॉस' फेम सपना चौधरी विरोधात अटक वॉरंट जारी; वाचा काय आहे नेमकं प्रकरण

'बिग बॉस' फेम सपना चौधरी विरोधात अटक वॉरंट जारी; वाचा काय आहे नेमकं प्रकरण

सपना चौधरी (Sapna Chaudhary) तिच्या डान्स आणि गाण्यांनी लोकांना घायाळ करते. पण अलीकडेच तिने असे काही केले, की त्यानंतर लखनऊच्या न्यायालयाने डान्सर आणि गायिका सपना चौधरीविरुद्ध अटक वॉरंट जारी केले (Arrest Warrant Against Sapna Chaudhary) आहे.

 • Share this:
  मुंबई,18 नोव्हेंबर-   सपना चौधरी  (Sapna Chaudhary)   तिच्या डान्स आणि गाण्यांनी लोकांना घायाळ करते. पण अलीकडेच तिने असे काही केले, की त्यानंतर लखनऊच्या न्यायालयाने डान्सर आणि गायिका सपना चौधरीविरुद्ध अटक वॉरंट जारी केले  (Arrest Warrant Against Sapna Chaudhary)  आहे. सपनावर शो रद्द केल्याचा आणि आलेल्या प्रेक्षकांना पैसे परत न केल्याचा आरोप आहे. अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी शंतनू त्यागी यांनी हरियाणवी नृत्यांगना आणि गायिका सपना चौधरी यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी केले असून या प्रकरणाच्या पुढील सुनावणीपर्यंत पोलिसांना कारवाई करण्यास सांगितले आहे.या प्रकरणाची पुढील सुनावणी 22 नोव्हेंबरला होणार आहे.
  सपना चौधरीला अटक केल्यानंतर पोलीस तिला न्यायालयासमोर हजर करणार आहेत. कारण याप्रकरणी न्यायालयाला सपनावर आरोप निश्चित करायचे आहेत. त्यामुळे ती न्यायालयात हजर राहणे अत्यंत आवश्यक आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील एफआयआरनंतर सपनाने तक्रार फेटाळण्यासाठी अर्ज केला होता. मात्र न्यायालयाने तो फेटाळून लावला होता.
  ४ वर्षांपूर्वीचं जुनं प्रकरण- सपना चौधरीवर दाखल झालेला हा गुन्हा सुमारे ४ वर्षे जुना आहे. वास्तविक, सपना चौधरीच्या विरोधात 14 ऑक्टोबर 2018 रोजी आशियाना पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली होती. 13 ऑक्टोबर रोजी लखनऊच्या स्मृती उपवनमध्ये दुपारी 3 ते 10 या वेळेत शो आयोजित केला होता, परंतु सपना शोमध्ये पोहोचली नाही, असा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणात सपना चौधरी व्यतिरिक्त कार्यक्रमाचे आयोजक जुनेद अहमद, नवीन शर्मा, इवाद अली, अमित पांडे आणि रत्नाकर उपाध्याय आहेत. 300-300 रुपये देऊन या कार्यक्रमाची तिकिटे प्रेक्षकांनी खरेदी केल्याचा आरोप आहे. सपना चौधरीचा हा शो पाहण्यासाठी हजारो लोक उपस्थित होते, मात्र 10 वाजेपर्यंत सपना चौधरी न आल्याने प्रेक्षकांनी गोंधळ घातला. गोंधळ होऊनही लोकांचे पैसे परत आले नसल्याचा आरोप आहे.
  Published by:Aiman Desai
  First published: