सिद्धार्थ आणि आलियाचा ब्रेकअप?

सिद्धार्थ आणि आलियाचा ब्रेकअप?

पण आता या दोघांचा ब्रेकअप झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे. जॅकलीन फर्नांडिसमुळे हा ब्रेकअप झाल्याचीही चर्चा आहे.

  • Share this:

16 ऑगस्ट: बॉलिवूडचे 'हॉट अॅन्ड हॅपनिंग' कपल सिद्धार्थ आणि आलिया हे रिलेशनमध्ये असल्याची चर्चा संपूर्ण बॉलिवूडमध्ये होती. गॅदरिंग असो किंवा अॅवार्ड फंक्शन हे दोघं सगळीकडे सोबत यायचे. पण आता या दोघांचा ब्रेकअप झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे. जॅकलीन फर्नांडिसमुळे हा ब्रेकअप झाल्याचीही चर्चा आहे.

दोघांनीही वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. कालांतराने दोघं मित्र होतीलही पण सध्या तरी दोघं एकामेकांना टाळतायत. एकामेकांशी बोलत नाहीत अशी चर्चा आहे. सिद्धार्थ आणि आलियाच्या ब्रेकअपला सिद्धार्थची 'ए जेन्टलमन'ची सहकलाकार जॅकलीन फर्नांडिस जबाबदार असल्याचं सांगितलं जातंय. या सिनेमामुळे दोघांमधील जवळीक वाढल्याचं सांगण्यात येतंय. यामुळेच आलिया आणि सिद्धार्थचा ब्रेकअप झाल्याचं बोललं जातंय.

First published: August 16, 2017, 4:59 PM IST

ताज्या बातम्या