रणवीर-दिपीकाचा ब्रेकअप?

या दोघांमध्ये कुठले गैरसमज झाल्यामुळे ब्रेकअप झालेला नाही तर कामाच्या प्रेशरमुळे हे दोघं एकमेकाला वेळ देऊ शकत नाहीत.

Chittatosh Khandekar | News18 Lokmat | Updated On: Jul 27, 2017 02:13 PM IST

रणवीर-दिपीकाचा ब्रेकअप?

27 जुलै : बॉलिवूडमधील हॉट आणि क्यूट जोडी म्हणजे रणवीर-दिपीका. पण आता रणवीर सिंह-दिपीका पदुकोणचा ब्रेकअप झाल्याची बातमी सगळीकडे फिरते आहे. 'राम-लीला','बाजीराव मस्तानी' सारखे हिट सिनेमे देणाऱ्या या दोघांमध्ये ब्रेकअप होणं ही त्यांच्या फॅन्ससाठी एक अत्यंत धक्कादायक बातमी आहे.

रणवीर-दिपीकाच्या ब्रेकअपच्या अनेक अफवा याआधीही आल्या आहेत. पण सूत्रांनुसार खरंच या दोघांचा ब्रेकअप झाला आहे. या दोघांमध्ये कुठले गैरसमज झाल्यामुळे ब्रेकअप झालेला नाही तर कामाच्या प्रेशरमुळे हे दोघं एकमेकाला वेळ देऊ शकत नाहीत. त्यामुळे त्या दोघांमधल्ये अंतर वाढत होतं आणि म्हणूनच या दोघांचा ब्रेकअप झाल्याचं बोललं जातंय.

रणवीर कपूरला लग्न करून संसार थाटायची इच्छा आहे पण दिपीका लग्न करण्यास तयार नाही आणि म्हणूनच या दोघांचा ब्रेकअप झाल्याचीही चर्चा चालू आहे. अजून तरी या बातमीचे ऑफिशियल कन्फर्मेशन आलेलं नाही. रणवीरला एक नवीन गर्लफ्रेंड मिळाल्यामुळे या दोघांचा ब्रेकअप झाल्याचंही बोललं जातंय.

सध्यातरी हे दोघं पद्मावतीच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 27, 2017 02:13 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...