मुंबई, 06 नोव्हेंबर: ब्राझीलची युवा स्टार पॉप गायिका मारिलिया मेंडोन्का (Marilia Mendonca died in Plane Crash) हिचा शुक्रवारी धक्कादायक मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. 26 वर्षीय मेगा-पॉप्यूलर गायिकेचे विमान अपघातात निधन झाले. या अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये आणखी चौघांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. मीडिया अहवालातील वृत्तानुसार यावेळी तिच्यासह तिचे एक काका, एक प्रोड्यूसर आणि दोन क्रू मेंबर्स उपस्थित होते. दरम्यान या प्लेन क्रॅशचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे.
ब्राझील संगीत क्षेत्रात Mendonça ही एक प्रसिद्ध गायिका होती. तिन्हे किशोरवयातच करिअरची सुरुवात केली होती. 2016 पर्यंत ती नॅशनल स्टार बनत यशाच्या शिखरावर पोहोचली होती. Mendonça 2019 मध्ये लॅटिन ग्रॅमी विजेती देखील राहिली आहे. तिच्या अशा अकाली निधनामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे.
Marília Mendonça, one of the most popular Brazilian pop singers who was iconic in a type of country music called sertanejo, was killed on Friday in a small plane crash. She was 26. https://t.co/z8WI1jNZEl
— The New York Times (@nytimes) November 6, 2021
या अपघातापूर्वी काहीच वेळ आधी तिने एक व्हिडीओ देखील पोस्ट केला होता. फ्लाइटमध्ये बोर्ड करण्याच्या आधीचा व्हिडीओ तिने पोस्ट केला होता.
essa é a realidade meu povo! hahahah me conta aqui nos comentários mais delícias desse estado maravilhoso que é Minas Gerais! pic.twitter.com/cGBx2kJrzR
— maria mendonça (@MariliaMReal) November 5, 2021
त्यावेळी कुणाच्या ध्यानीमनीही नव्हते की अशी काही घटना घडेल. ब्राझीलमधीलच Caratinga मध्ये तिचा परफॉर्मन्स होता, त्याकरता ती विमानप्रवास करत होती. त्यावेळी पोहोचण्याच्या अवघ्या 12 किलोमीटर आधी ही घटना घडली. Marilia Mendonca च्या पश्चात तिचा दोन वर्षांचा मुलगा आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.