'दशक्रिया' सिनेमाला ब्राम्हण महासंघाचा विरोध

'दशक्रिया' सिनेमाला ब्राम्हण महासंघाचा विरोध

'पद्मावती' आणि 'न्यूड' सिनेमानंतर 'दशक्रिया' या सिनेमावरून आता वाद सुरू झालाय. हा सिनेमा रिलीज करायला ब्राम्हण महासंघाने विरोध दर्शवलाय. या सिनेमातल्या काही दृष्य आक्षेपार्ह असून त्यामुळे ब्राम्हण समाजाच्या भावना दुखावत असल्याची भूमिका महासंघाने घेतलीय.

  • Share this:

16 नोव्हेंबर : 'पद्मावती' आणि 'न्यूड' सिनेमानंतर 'दशक्रिया' या सिनेमावरून आता वाद सुरू झालाय. हा सिनेमा रिलीज करायला ब्राम्हण महासंघाने विरोध दर्शवलाय. या सिनेमातल्या काही दृष्य आक्षेपार्ह असून त्यामुळे ब्राम्हण समाजाच्या भावना दुखावत असल्याची भूमिका महासंघाने घेतलीय. त्यामुळे पुण्यासह मुंबईतल्या काही थिएटर्सना हा सिनेमा रिलीज करू नये असं निवेदन महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी दिलंय. यामुळे पुण्यातील सिटीप्राईड सिनेमागृहाने सिनेमाचं अॅडव्हान्स बुकिंग थांबवलंय.

सिनेमागृहाची तोडफोड करणार नसलो तरिही त्याबाहेर धरणं देऊन कोणालाही हा सिनेमा पाहू देणार नाही अशी भूमिका महासंघाने घेतलीय. दरम्यान उद्या रिलीज होणारा हा सिनेमा तब्बल 150 सिनेमागृहांमध्ये रिलीज करायचा निर्मात्यांचा मानस होता. मात्र विरोधाच्या पार्श्वभूमीवर दशक्रियाच्या रिलीजमध्ये अडथळा निर्माण झालाय.

दरम्यान सिनेमाच्या निर्मात्यांनी ब्राम्हण महासंघाला मुंबईत येऊन हा सिनेमा पाहण्याचा प्रस्ताव दिला असला तरीही हा शो पुण्यातच आयोजित करण्याची अडमुठी भूमिका महासंघाने घेतलीय.

First published: November 16, 2017, 2:43 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading