मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Brahmastra Trailer Out: जबरदस्त अ‍ॅक्शन, डोळे दिपवणारा VFX, अवघ्या दोन तासांत मिळाले तब्बल इतके लाख व्ह्यूज

Brahmastra Trailer Out: जबरदस्त अ‍ॅक्शन, डोळे दिपवणारा VFX, अवघ्या दोन तासांत मिळाले तब्बल इतके लाख व्ह्यूज

बॉलिवूड  (Bollywood) अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट्ट (Ranbir Kapoor-Alia Bhatt) या दोघांसाठी आजचा दिवस मोठा आहे. कारण आज अखेर रणबीर आणि आलिया स्टारर 'ब्रह्मास्त्र'चा (Brahmastra movie) ट्रेलर रिलीज झाला आहे.

  मुंबई, 15 जून-   बॉलिवूड   (Bollywood)  अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट्ट (Ranbir Kapoor-Alia Bhatt) या दोघांसाठी आजचा दिवस मोठा आहे. कारण आज अखेर रणबीर आणि आलिया स्टारर 'ब्रह्मास्त्र'चा (Brahmastra movie) ट्रेलर रिलीज झाला आहे. चाहते ट्रेलरची आतुरतेने वाट पाहत होते. इतकंच नव्हे तर रणबीर कपूर आणि आलिया भट्टदेखील यासाठी खूप उत्सुक होते. कारण या दोघांचा हा एकत्र पहिलाच चित्रपट आहे. नुकतंच या चित्रपटाचा भव्यदिव्य ट्रेलर समोर आला आहे. या ट्रेलरमध्ये बिग बी अमिताभ बच्चन यांचा भारदस्त आवाज ऐकायला मिळत आहे. या ट्रेलरमध्ये हा चित्रपट शिवा अर्थातच रणबीर कपूरभोवती फिरतणार असल्याचं दिसून येत आहे. चित्रपटाचा जबरदस्त ट्रेलर पाहून सर्वच थक्क झाले आहेत. ट्रेलर पाहून चित्रपटाची उत्सुकता नक्कीच वाढणार यात शंका नाही. या चित्रपटाचा ट्रेलर अतिशय रंजक आहे.'ब्रह्मास्त्र' च्या ट्रेलरला युट्युबवर अवघ्या दोन तासांत तब्बल 11 लाखांच्यावर व्ह्यूज मिळाले आहेत. तर आलिया भट्टच्या इन्स्टाग्रामवर 16 लाखाच्यावर व्ह्यूज मिळाले आहेत. तब्बल 300 कोटींच्या घरात बजेट असणाऱ्या या चित्रपटात रणबीर कपूर-आलिया भट्ट (Ranbir Kapoor-Alia Bhatt) ही सुप्रसिद्ध जोडी असणार आहे. ही एक ट्रायलॉजी असून हा या चित्रपटाचा पहिला भाग आहे. अयान मुखर्जीने (Ayan Mukerji) दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात (Amitabh Bachchan) महानायक अमिताभ बच्चन, (Nagarjuna) नागार्जुन, (Mouni Roy) मौनी रॉय यांच्या मुख्य भूमिका असणार आहेत. या चित्रपटासाठी कलाकारांनी त्यांचं आयुष्य पणाला लावत खूप कष्ट घेतले आहेत असं कलाकार सांगतात. 300 कोटींच्या घरात बजेट असणाऱ्या या चित्रपटासाठी रणबीर कपूरने जवळपास 25-30 कोटी रुपये घेतले अशी माहिती समोर येत आहे. आलियाने तब्ब्ल 10-12 कोटी रुपये घेतल्याचं सांगितलं जात आहे. अमिताभ बच्चन यांनी जवळपास 8-10 कोटी रुपये आकारले आहेत.
  Published by:Aiman Desai
  First published:

  Tags: Alia Bhatt, Amitabh Bachchan, Bollywood News, Ranbir kapoor

  पुढील बातम्या