Home /News /entertainment /

Brahmastra Trailer: 'ओव्हर अँटिंग करु नको', 'ब्रह्मास्त्र'च्या ट्रेलरवर केलेल्या कंमेंटमुळे अमृता खानविलकर ट्रोलर्सच्या निशाण्यावर

Brahmastra Trailer: 'ओव्हर अँटिंग करु नको', 'ब्रह्मास्त्र'च्या ट्रेलरवर केलेल्या कंमेंटमुळे अमृता खानविलकर ट्रोलर्सच्या निशाण्यावर

मराठी चित्रपटसृष्टीतील चंद्रा म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री (Amruta Kahnvilkar) अमृता खानविलकर सध्या बरीच चर्चेत असते. पण तिच्या एका कामगिरीमुळे सध्या तिला टीकेला सामोरं जावं लागत आहे.

    मुंबई 15 जून: बॉलिवूडमधील बहुचर्चित सिनेमा (Brahmastra Official Trailer) ‘ब्रह्मास्त्र भाग 1 शिवा’ चा ट्रेलर धुमधडाक्यात आज प्रदर्शित झाला. या ट्रेलरला काहीच तासात दहा लाखाहून जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. या ट्रेलरच्या रिलीजसाठी कलाकार कसून तयारी करताना दिसत होते. स्वतः आलिया (Alia Bhatt) आणि रणबीरने (Ranbir Kapoor) या चित्रपटाचा ट्रेलजर आवर्जून पहा म्हणून  आवाहन करणारा विडिओ शेअर केला होता. आणि आज या ट्रेलर नंतर सगळीकडे धमाका होताना दिसत आहे. मात्र या ट्रेलरमुळे अमृता खानविलकरला (Amruta Khanvilkar) ट्रोलर्सचा सामना करावा लागत आहे. अमृता खानविलकर हे नाव सध्या मराठी नाही तर बॉलिवूडमध्ये सुद्धा गाजताना दिसत आहे. अमृता चंद्रमुखी चित्रपटामुळे बरीच चर्चेत आली आहे. पण ब्रह्मास्त्र चित्रपटावर तिने केलेल्या एका कमेंटमुळे सध्या तिच्यावर टीका होताना दिसत आहे. इतरांना जसा हा ट्रेलर पाहून स्वतःच्या भावना काबू करता आल्या नाहीत अशीच कशीही हालत अमृताची सुद्धा झाली. अचाट करणारे VFX, अंगावर काटा आणणारी दृश्य आणि थ्रिलने भरलेला हा चित्रपटाचं ट्रेलर पाहून अक्षरशः डोळे दिपून जातात. अमृताने सुद्धा अशाच कॅशिया अर्थाची एक कमेंट ट्रेलरवर केली. आलिया भट्टने शेअर केलेल्या पोस्टखाली तिने ही कमेंट केल्यावर एका युजरने तिच्यावर निशाणा साधत असं म्हटलं, “तू जास्त ओव्हर ऍक्टिंग करू नकोस, एवढा ही काही खास नाहीये ट्रेलर तुला ही माहित आहे.” अमृताच्या रिअक्शनवर अशी कमेंट आल्याने सध्या बरीच चर्चा होताना दिसत आहे. यावर मात्र ट्रोलरला एका युजरने खडे बोल सुनावत अमृताची बाजू घेतली आहे. “ट्रेलर खरंच खूप सुंदर आहे. आपण हॉलिवूडच्या सिनेमानं प्रोत्साह देऊ शकतो तर आपल्या चित्रपटांना का देऊ नये?” अशा शब्दात त्याने अमृताच्या म्हणण्याला दुजोरा दिला आहे. हे ही वाचा- Brahmastra Trailer Out: जबरदस्त अ‍ॅक्शन, डोळे दिपवणारा VFX, अवघ्या दोन तासांत मिळाले तब्बल इतके लाख व्ह्यूज अमृता सध्या चंद्राच्या फिव्हर मधून बाहेरच आली नाहीये. तिचा ‘चंद्रमुखी’ हा चित्रपट सलग सात आठवडे बॉक्स ऑफिसवर तुफान गाजतो आहे. लोककलाकाराच्या आयुष्यात घडणारी एक दर्जेदार प्रेमकथा आणि सोबत त्याला असलेलं राजकीय वळण यावर आधारित हा चित्रपट आहे. यात चंद्रमुखी उमाजीराव जुन्नरकर या लोककलावंतीणीची भूमिका तिने साकारली आहे.
    Published by:Rasika Nanal
    First published:

    Tags: Alia Bhatt, Marathi actress, Marathi entertainment, Ranbir kapoor

    पुढील बातम्या