मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Brahmastra: दुसऱ्या दिवशीही आलिया-रणबीरचं 'ब्रह्मास्त्र' सुसाट; कमावले तब्बल इतके कोटी

Brahmastra: दुसऱ्या दिवशीही आलिया-रणबीरचं 'ब्रह्मास्त्र' सुसाट; कमावले तब्बल इतके कोटी

आलिया भट्ट आणि रणबीर कपूरच्या 'ब्रह्मास्त्र' चित्रपटाची प्रेक्षकांना प्रचंड उत्सुकता होती. हा चित्रपट 9 सप्टेंबरला रिलीज झाला आहे. चित्रपटाबाबत संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Maharashtra, India
  • Published by:  Aiman Desai

मुंबई, 11 सप्टेंबर-  आलिया भट्ट आणि रणबीर कपूरच्या 'ब्रह्मास्त्र' चित्रपटाची प्रेक्षकांना प्रचंड उत्सुकता होती. हा चित्रपट 9 सप्टेंबरला रिलीज झाला आहे. चित्रपटाबाबत संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. अशातच चित्रपट बॉक्स ऑफिसवर कशी कमाई करणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. दरम्यान आता 'ब्रह्मास्त्र' च्या दुसऱ्या दिवसाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनचा आकडा समोर आला आहे.

'ब्रह्मास्त्र' हा बहुचर्चित चित्रपट सध्या चित्रपटगृहांमध्ये दाखल झाला आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धमाकेदार सुरुवात केली आहे. दुसऱ्या दिवशीही कमाईचा वेग वाढलेला दिसून आला. मीडिया रिपोर्टनुसार, पहिल्या दिवशी या चित्रपटाने जागतिक पातळीवर 75  कोटींची कमाई करत अनेक रेकॉर्ड मोडीत काढले होते. यानंतर चित्रपटाने दुसऱ्या दिवशीही चांगली कमाई करत सर्वांचं लक्ष वेधलं आहे.

या चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनने पहिल्या दिवशी 32 कोटींची कमाई केली होती. तर चित्रपटाने दुसऱ्या दिवशी 37 कोटींची कमाई केली आहे. म्हणजेच चित्रपटाने ओपनिंग डे पेक्षाही जास्त कमाई केल्याचं म्हटलं जात आहे. या चित्रपटाबाबत प्रेक्षकांनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींना चित्रपट रटाळवाना वाटत आहे तर काहींना यामध्ये थ्रिल दिसून येत आहे. नकारात्मक प्रतिक्रिया मिळूनसुद्धा चित्रपटाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन वाढत असल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. या चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनने दोन दिवसात मिळून 69 कोटींचा गल्ला जमवला आहे. त्यामुळे तिसऱ्या दिवशी हा चित्रपट 100 कोटींचा आकडा पार करेल असा अंदाज वर्तवला जात आहे.

(हे वाचा:Brahmastra: 'ब्रह्मास्त्र' ची रेकॉर्डब्रेक ओपनिंग, पहिल्याच दिवशी कमावले इतके कोटी )

हा ब्रह्मास्त्रचा पहिला भाग आहे. 'ब्रह्मास्त्र'च्या पहिल्या भागाचं नाव 'ब्रह्मास्त्र भाग 1- शिवा' असं आहे. तर या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाचं नाव 'ब्रह्मास्त्र भाग 2- देव' असं आहे. चित्रपटाचा पहिला भाग हा शिवा (रणबीर कपूर ) नावाच्या मुलावर अर्थातच आधारित आहे.त्याच्याकडे काही दैवी शक्ती असतात. त्याच्याकडे एक 'अस्त्र' असतं. त्या शक्तीच्या आधारे त्याला पृथ्वीवर येणाऱ्या संकटाची चाहूल आधीच लागते. तो या शक्तीच्या आधारे या जगाचं संरक्षण करण्यासाठी आणि आपल्यामध्ये दडलेल्या शक्तीचा शोध घेण्यासाठी बाहेर पडतो. ब्रह्मास्त्रच्या पहिल्या भागाचा शेवट फारच रंजक आहे. कारण यामध्ये दुसऱ्या भागाची अधिकृत घोषणा केलेली आहे.

First published:

Tags: Alia Bhatt, Bollywood News, Entertainment, Ranbir kapoor