मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Brahmastra Box Office Collection: आलिया-रणबीरची जादू कायम; सातव्या दिवशीही बंपर कमाई

Brahmastra Box Office Collection: आलिया-रणबीरची जादू कायम; सातव्या दिवशीही बंपर कमाई

ब्रह्मास्त्र

ब्रह्मास्त्र

'ब्रह्मास्त्र' हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घालत आहे. आलिया भट्ट-रणबीर कपूरची केमिस्ट्री प्रेक्षकांना फारच पसंत पडली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Maharashtra, India
  • Published by:  Aiman Desai

मुंबई, 16 सप्टेंबर-   'ब्रह्मास्त्र' हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घालत आहे. आलिया भट्ट-रणबीर कपूरची केमिस्ट्री प्रेक्षकांना फारच पसंत पडली आहे. हे नवरा-बायको पहिल्यांदाच पडद्यावर एकत्र झळकले आहेत. त्यामुळे त्यांच्या चाहत्यांना चित्रपटाबाबत फारच कुतूहल आहे. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अनेक रेकॉर्ड मोडीत काढत जबरदस्त कमाई केली आहे. दरम्यान चित्रपटाच्या सातव्या दिवसाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन आता समोर आलं आहे.

दिग्दर्शक अयान मुखर्जी दिग्दर्शित 'ब्रह्मास्त्र' या चित्रपटाने रिलीज पूर्वीच प्रेक्षकांच्या मनात प्रचंड ऊत्सुकता निर्माण केली होती. हा बहुप्रतीक्षित चित्रपट 9 सप्टेंबर रोजी चित्रपटगृहांमध्ये रिलीज झाला आहे. या चित्रपटाने रिलीजच्या पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर धमाकेदार ओपनिंग केली होती. चित्रपटाने पहिल्या दिवशी तब्बल 37 कोटींचा व्यवसाय केला होता. यामध्ये साऊथ व्हर्जनचे 5 कोटी रुपयेसुद्धा समाविष्ट होते. चित्रपटाने आठवड्याच्या शेवटी 83 कोटींचा गल्ला जमवला होता. तर आंतराराष्ट्रीय पातळीवर या चित्रपटाने तब्बल 225 कोटींचा आकडा पार केला होता.

आठवड्याच्या सुरुवातीला म्हणजेच सोमवारी चित्रपटाच्या कमाईचा आकडा खाली आला होता. परंतु त्यानंतर चित्रपटाच्या कमाईने पुन्हा वेग पकडला आहे. आता या चित्रपटाला तब्बल 7 दिवस पूर्ण झाले आहेत. चित्रपटाने सातव्या दिवशी म्हणजेच 15 सप्टेंबरला तब्बल 9 ते 10 कोटींची कमाई केली आहे. त्यामुळे हिंदी व्हर्जनच्या कमाईचा आकडा 174 च्या पुढे गेला आहे. त्यामुळे लवकरच चित्रपट 200 कोटी क्लबमध्ये सहभागी होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

(हे वाचा:Akshay Kumar Son: 20 वर्षांचा झाला अक्षय कुमारचा लेक; दिसतोय फारच हॅन्डसम )

रणबीर आणि आलियाच्या या चित्रपटाची प्रेक्षकांना प्रचंड आतुरता होती. या चित्रपटाच्या सेटवरच आलिया-रणबीरमध्ये जवळीकता निर्माण झाली होती. त्यानंतर ते एकमेकांच्या प्रेमात पडले होते. आणि चित्रपट रिलीजपूर्वीच त्यांनी लग्न केलं. आता हे गोड जोडपं आईबाबासुद्धा बनणार आहे. त्यामुळे हा चित्रपट आलिया आणि रणबीरसाठी फारच खास आहे. सध्या बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाचा बोलबाला दिसून येत आहे.

First published:

Tags: Alia Bhatt, Bollywood News, Entertainment, Ranbir kapoor