मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Brahmastra Box Office Collection: बॉक्स ऑफिसवर 'ब्रह्मास्त्र'चा बोलबाला; पाचव्या दिवशी केली तब्बल इतकी कमाई

Brahmastra Box Office Collection: बॉक्स ऑफिसवर 'ब्रह्मास्त्र'चा बोलबाला; पाचव्या दिवशी केली तब्बल इतकी कमाई

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्टचा बहुचर्चित 'ब्रह्मास्त्र' हा सिनेमा अखेर रिलीज झाला आहे.

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्टचा बहुचर्चित 'ब्रह्मास्त्र' हा सिनेमा अखेर रिलीज झाला आहे.

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्टचा बहुचर्चित 'ब्रह्मास्त्र' हा सिनेमा अखेर रिलीज झाला आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Maharashtra, India
  • Published by:  Aiman Desai

मुंबई, 14  सप्टेंबर-   बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्टचा बहुचर्चित 'ब्रह्मास्त्र' हा सिनेमा अखेर रिलीज झाला आहे. या चित्रपटाच्या रिलीपूर्वीच 'बॉयकॉट ब्रह्मास्त्र' हा ट्रेंड सुरु होता. तरीसुद्धा चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केल्याचं दिसून येत आहे. अयान मुखर्जी दिग्दर्शित ब्रह्मास्त्रने बॉक्स ऑफिसवर दमदार ओपनिंग केली होती. अवघ्या तीन दिवसांतच या चित्रपटाने 100 कोटींचा टप्पा पार केला होता. आता ब्रह्मास्त्रच्या पाचव्या दिवसाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर आलं आहे.

आलिया-रणबीरच्या या चित्रपटाने वीकेंडमध्येच 125 कोटींची कमाई केली होती. परंतु सोमवार आणि मंगळवारी कमाईत थोडी घट झालेली दिसून आली. मात्र, रिलीजच्या पाचव्या दिवशी म्हणजे 13 सप्टेंबरलाही चित्रपटाने 13.75 कोटींची कमाई करत बॉक्स ऑफिसवर पुन्हा वेग पकडला आहे. सध्या हिंदी व्हर्जन 150 कोटी क्लबमध्ये सहभागी झाला आहे.

वीकेंडनंतरही 'ब्रह्मास्त्र' बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करत आहे. येत्या वीकेंडमध्ये कमाईचा आकडा आणखी वाढेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. यासोबतच हा चित्रपट अनेक नवे रेकॉर्डही आपल्या नावावर करु शकतो. 'बॉयकॉट बॉलिवूड' चा परिणाम 'ब्रह्मास्त्र'वर झालेला दिसून येत नाहीय. त्यामुळेच या चित्रपटाने पहिल्याच दिवशी 36.42 कोटी कमावले होते. चित्रपटाने शनिवारी 42.41 कोटींची कमाई केली होती. तर रविवारी हा आकडा 45.66 कोटींवर पोहोचला होता.

(हे वाचा:Brahmastra Box Office Collection: चौथ्या दिवशीही बॉक्स ऑफिसवर पैशांचा पाऊस, ब्रह्मास्त्रची जबरदस्त कमाई )

'ब्रह्मास्त्र'साठी अयान मुखर्जीने तब्बल 9 वर्षे मेहनत घेतली आहे. हा चित्रपट खास बनवण्यासाठी व्हीएफएक्सचा प्रचंड वापर करण्यात आला आहे. आलिया आणि रणबीर व्यतिरिक्त या चित्रपटात अमिताभ बच्चन,नागार्जुन आणि मौनी रॉय यांचासुद्धा महत्वाच्या भूमिका आहेत.तसेच शाहरुख खानचासुद्धा दमदार कॅमिओ आहे.हा चित्रपट हिंदी, तामिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम अशा विविध भाषेत रिलीज झाला आहे.

First published:

Tags: Alia Bhatt, Bollywood, Entertainment, Ranbir kapoor