मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Brahmastra Collection: आलिया-रणबीरची जादू संपली? बाराव्या दिवशी सिनेमाने केली केवळ इतकी कमाई

Brahmastra Collection: आलिया-रणबीरची जादू संपली? बाराव्या दिवशी सिनेमाने केली केवळ इतकी कमाई

वाईट प्रतिक्रिया आणि नकारात्मक रिव्ह्यू मिळूनसुद्धा 'ब्रह्मास्त्र' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली आहे.

वाईट प्रतिक्रिया आणि नकारात्मक रिव्ह्यू मिळूनसुद्धा 'ब्रह्मास्त्र' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली आहे.

वाईट प्रतिक्रिया आणि नकारात्मक रिव्ह्यू मिळूनसुद्धा 'ब्रह्मास्त्र' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Maharashtra, India
  • Published by:  Aiman Desai

मुंबई, 21 सप्टेंबर-   गेल्या कित्येक महिन्यांपासून बॉक्स ऑफिसवर बॉलिवूड चित्रपटांचा जादू नाहीसा झाला होता. परंतु बॉलिवूड लव्हबर्ड्स आलिया भट्ट आणि रणबीर कपूरच्या 'ब्रह्मास्त्र' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरचा हिंदी चित्रपटांच्या कमाईचा दुष्काळ संपुष्ठात आणला आहे. या चित्रपटाने रिलीज होताच धमाका केला होता. वाईट प्रतिक्रिया आणि नकारात्मक रिव्ह्यू मिळूनसुद्धा चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली आहे. परंतु आता आलिया आणि रणबीरची जादू नाहीशी होत आहे का? अशी शंका व्यक्त केली जात आहे. कारण रिलीजच्या बाराव्या दिवशी चित्रपटाच्या कमाईत मोठी घट झालेली दिसून येत आहे.

आलिया भट्ट आणि रणबीरकपूरची प्रमुख भूमिका असलेला 'ब्रम्हास्त्र' हा चित्रपट 9 सप्टेंबरला रिलीज झाला होता. ओपनिंग विकेंडला चित्रपट सगळ्या भारतीय भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे. विकेंडला सिनेमानं एकूण 122.58 करोडची कमाई केली होती. चित्रपटानं पहिल्या दिवशी भारतात 37 कोटींची कमाई केली होती. इतक्या ट्रोलिंगनंतर सिनेमानं ही केलेली ही बंपर कमाई पाहून सगळ्यांच्याच भुवया उंचवाल्या होत्या. तर दुसऱ्या दिवशी सिनेमानं 42 कोटींचा गल्ला जमवला होता. तिसऱ्या दिवशी ही कमाई वाढत तब्बल 44.80 कोटींवर पोहोचली होती. तर अवघ्या काही दिवसांत चित्रपटाने 200 कोटी क्लबमध्ये प्रवेश केला होता.

हेही वाचा: राजू श्रीवास्तव यांचं निधन, ऑटो ड्रायव्हर ते गजोधर भैया राजू श्रीवास्तव यांचा प्रवास फारच रंजक

दरम्यान आता चित्रपटाच्या कमाईत घट होत असल्याचा म्हटलं जात आहे. नुकतंच चित्रपटाच्या बाराव्या दिवसाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर आलं आहे. परंतु हे कलेक्शन इतर दिवसांच्या तुलनेत कमी असल्याचं दिसून येत आहे. रिलीजच्या 12 व्या दिवशी 'ब्रह्मास्त्र' ने केवळ 3.5 ते 4.20 कोटींचीच कमाई केल्याचं सांगितलं जात आहे. चित्रपट रिलीज झाल्यापासून आजपर्यंतची ही सर्वात कमी कमाई आहे.त्यामुळे आता 'ब्रह्मास्त्र'चा जादू संपला की काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. सोबतच आता ब्रह्मास्त्रची एकूण कमाई 224.10 कोटी इतकी झाली आहे.

हे वाचा:Brahmastra Box Office Collection: बॉक्स ऑफिसवर 'ब्रह्मास्त्र'चा बोलबाला; पाचव्या दिवशी केली तब्बल इतकी कमाई )

'ब्रह्मास्त्र' हा चित्रपट दिग्दर्शक अयान मुखर्जीने दिग्दर्शित केला आहे. हा चित्रपट अयान मुखर्जीचा ड्रीम प्रोजेक्ट असल्याचं म्हटलं जातं. या चित्रपटासाठी तब्बल 9 वर्षांचा कालावधी लागला आहे. चित्रपटात व्हीएफएक्सचा जबरदस्त वापर करण्यात आला आहे. या चित्रपटात आलिया भट्ट आणि रणबीर कपूर व्यतिरिक्त अमिताभ बच्चन, साऊथ सुपरस्टार नागार्जुन, मौनी रॉय अशी तगडी स्टारकास्ट आहे. हा चित्रपट शिवा अर्थातच रणबीर कपूरभोवती फिरणारा आहे.

First published:

Tags: Alia Bhatt, Bollywood, Entertainment, Ranbir kapoor