ब्रॅड पिटनं शाहरूखकडून घेतले नृत्याचे धडे

हाॅलिवूड अभिनेता ब्रॅड पिट आपला सिनेमा ' वाॅर मशीन'च्या प्रमोशनसाठी भारतात आलाय. पिट शाहरूख खानसोबत एका कार्यक्रमात हजर होता.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: May 25, 2017 01:48 PM IST

ब्रॅड पिटनं शाहरूखकडून घेतले नृत्याचे धडे

25 मे : हाॅलिवूड अभिनेता ब्रॅड पिट आपला सिनेमा ' वाॅर मशीन'च्या प्रमोशनसाठी भारतात आलाय. पिट शाहरूख खानसोबत एका कार्यक्रमात हजर होता. आणि दोघांनी एकमेकांशी साधलेला संवाद चांगलाच रंगला.

ब्रॅड पिटनं शाहरूखला म्हटलं, ' मी बाॅलिवूडमध्ये चालणार नाही. कारण मला नाचता येत नाहीय.' तेव्हा किंग खाननं त्याला छान उत्तर दिलं. तो म्हणाला, ' आम्ही तुम्हाला बाॅलिवूडमध्ये नाचवू. इथे आम्ही सगळ्यांना नाचवतो.'

आपल्याला इंडस्ट्रीत इतकी वर्ष होऊनही, अजून आपण नृत्यात माहीर नाही, असं शाहरूख म्हणाला. 'मी फक्त हात पसरवतो आणि ही स्टेप करतो.' असं किंग खान मिष्किलपणे म्हणाला. यावेळी दोन्ही कलाकारांनी वाॅर मशीन आणि आपल्या सिने सफरबद्दल चर्चा केली.

53 वर्षांच्या पिटला विचारलं की तुझं करियर इतकं मोठं असण्यामागे काय रहस्य आहे? त्यावर तो म्हणाला, ' याचं उत्तर मी शोधतोय. मी नेहमीच काही तरी नवं शोधत असतो. मी आणि शाहरूख नेहमीच आमच्या करियरमधल्या चुका सुधारतो. म्हणू यश मिळतं.'

शाहरूखनं 1995मध्ये ब्रॅड पिटचा 'ट्वेल्थ मंकीज' सिनेमा पाहिला आणि तो फॅन बनला. शाहरूखनं पिटच्या ‘द क्यूरियस केस ऑफ बेंजामिन बटन’ सिनेमातल्या अभिनयाचं कौतुक केलं. पिटनं शाहरूखला भारतात सिनेमा पूर्ण व्हायला किती दिवस लागतात, असं विचारलं. तेव्हा किंग खाननं 40 दिवस किंवा त्यापेक्षा जास्त असं उत्तर दिलं.

वाॅर मशीन 26 मे रोजी रिलीज होतेय. पिट त्यात अफगाणिस्तानात असलेल्या अमेरिकन सैन्याचा जनरल आहे. डेव्हिड मिशोड दिग्दर्शित हा सिनेमा  दिवंगत पत्रकार माइकल हॅस्टिंग्सचं पुस्तक  ‘द ऑपरेटर्स: द वाइल्ड एंड टेरिफाइंग इनसाइड स्टोरी ऑफ अमेरिकाज वॉर इन अफगाणिस्तान’वर आधारित आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 25, 2017 01:48 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...