ट्विटरवर #BoycottNetflixचा ट्रेंड; 'अ सुटेबल बॉय' सीरिजमध्ये लव्ह जिहादला पाठिंबा दिल्याचा आरोप

ट्विटरवर #BoycottNetflixचा ट्रेंड; 'अ सुटेबल बॉय' सीरिजमध्ये लव्ह जिहादला पाठिंबा दिल्याचा आरोप

ट्विटरवर सध्या #BoycottNetflix हा ट्रेंड सुरू आहे. 'अ सुटेबल बॉय' या वेब सीरिजमधील दृश्यावर नेटकऱ्यांनी आक्षेप घेतला आहे.

  • Share this:

मुंबई, 22 नोव्हेंबर: काही दिवसांपूर्वी तनिष्कच्या एका जाहिरातीमुळे ट्विटवरवर वादळ आलं होतं. बॉयकॉट तनिष्क (#boycott tanishq) चा ट्रेंड व्हायरल होत होता. तनिष्कच्या एका जाहिरातीमध्ये लव्ह जिहादला पाठिंबा देण्यात आला आहे असा आरोप या जाहिरातीवर करण्यात आला होता. आता बॉयकॉय नेटफ्लिक्सचा (#BoycottNetflix) ट्रेंड ट्विटरवर सुरू आहे. नेटफ्लिक्सवर काही दिवसांपूर्वी अ सुटेबल बॉय (A Suitable Boy) ही नेटफ्लिक्स ओरिजीनल सीरिज प्रदर्शित झाली होती. त्यातील एका दृश्यावर आक्षेप घेण्यात आला आहे.

भारत नुकतात स्वतंत्र झाल्यानंतर भारतातली परिस्थिती, राजकारण आणि त्याभोवती फिरणारी प्रेमकथा या सीरिजमध्ये दाखवण्यात आली आहे. या सीरिजमधील 2 पात्र लता मेहेरा आणि कबीर दुर्रानी मंदिराच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये एकमेंकांना किस करत आहेत असं दाखवण्यात आलं आहे. या दृश्यावर अनेकांनी आक्षेप घेतला आहे.

भाजपाच्या गौरव तिवारी यांनी हे दृश्य ट्विटर हँडलवर शेअर करत म्हटलं आहे की, ‘नेटफ्लिक्सवरील अ सुटेबल बॉय या वेब सीरिजमध्ये हिंदू मुलगी मुस्लीम मुलाला मंदिराच्या परिसरात किस करत आहे असं दृश्य दाखवण्यात आलं आहे.’ या दृश्याला त्यांनी विरोध केला आहे. त्यांच्या ट्वीटमध्ये त्यांनी असंही म्हटलं आहे की, ‘याप्रकरणी मी एफआयआरही दाखल केली आहे.’

अ सुटेबल बॉय ही वेब सीरिज मीरा नायर यांची आहे. काही नेटकऱ्यांनी यातल्या कथेला लव्ह जिहादला पाठिंबा देत असल्याचा आरोप केला आहे. आता तनिष्कनंतर अ सुटेबल बॉय या वेब सीरिजवर लव्ह जिहादचे आरोप करण्यात आले आहेत. याप्रकरणी नेटफ्लिक्स आणि सीरिजचे निर्माते काय भूमिका घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Published by: Amruta Abhyankar
First published: November 22, 2020, 5:02 PM IST
Tags: web series

ताज्या बातम्या