S M L

राष्ट्रपतींना वेळ नसेल तर उपराष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार द्या - कलाकरांकडून प्रस्ताव

आम्ही राष्ट्रपतींच्याच हस्ते पुरस्कार स्वीकारू, अन्यथा सोहळ्यावर बहिष्कार टाकू, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे.

Renuka Dhaybar | Updated On: May 3, 2018 01:55 PM IST

राष्ट्रपतींना वेळ नसेल तर उपराष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार द्या - कलाकरांकडून प्रस्ताव

03 मे : 65 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार वितरण वादावर आता कलाकारांनी एक उपाय सुचवलाय. राष्ट्रपतींना पूर्ण वेळ उपस्थित राहणं शक्य नसेल, तर उपराष्ट्रपतींच्या हस्ते वितरण करा, असं कलाकरांनी सुचवलंय. पण यावर राष्ट्रपतींचं सचिवालय किंवा माहिती, प्रसारण मंत्रालयाकडून उत्तर आलेलं नाहीये. कारण, व्यस्त वेळापत्रकामुळे राष्ट्रपती रामनाथ कोविंद सोहळा संपेपर्यंत उपस्थित राहणार नाहीत. त्यामुळे ते अकराच मानकऱ्यांना सन्मानित करणार आहेत. राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार वितरण झालं नाही, तर सोहळ्यावर बहिष्कार टाकू, असा पवित्रा पुरस्कार विजेत्यांनी घेतला आहे.

थोड्याच वेळात यासंबंधी दिल्लीच्या अशोक हॉटेलमध्ये तातडीची बैठक घेतली जाणार आहे. त्यानंतर यासंदर्भात अंतिम निर्णय घेतला जाईल. 66 पुरस्करार्थींपैकी जवळ जवळ 60 कलाकारांनी बहिष्कार करणार असल्याच्या पत्रकावर स्वाक्षऱ्या करून पाठींबा नोंदवला आहे. प्रादेशिक कलाकारांनीही यावर ठाम भूमिका दर्शवली आहे. पण दरम्यान, राष्ट्रपती प्रदान करणार असलेले हे अकरा पुरस्कार नेमके कोणते हे अद्याप स्पष्ट नसलं तरी आधी तांत्रिक पुरस्कार आणि नंतर मुख्य पुरस्कार असा क्रम असतो, असं सूत्रांनी सांगितलं.

या पुरस्कार सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिकेवर विजेत्यांना पारितोषिक राष्ट्रपतींच्या हस्ते देण्यात येईल, असे नमूद करण्यात आले होते. परंतु, चित्रपट महोत्सव विभागाच्या संचालकांकडून विजेत्या कलाकारांना या सोहळ्याच्या रंगीत तालमीसाठी पाचारण करण्यात आले तेव्हा 107 पुरस्कार हे स्मृती इराणींच्या हस्ते दिले जातील, अशी माहिती देण्यात आली. तेव्हा कलाकारांनी याबद्दल नाराजी व्यक्त करायला सुरूवात केली.

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेते

सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट - कच्चा लिंबू

Loading...

सर्वोत्कृष्ट लघुपट विषेश पुरस्कार - नागराज मंजुळे, पावसाचा निबंध

सर्वोत्कृष्ट बालचित्रपट - म्होरक्या

सर्वोत्कृष्ट बालकलाकार - म्होरक्या

सर्वोत्कृष्ट मराठी लघुपट - मयत

सर्वोत्कृष्ट संकलक - मृत्यूभोग

सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट - न्यूटन

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक - अमित मसुरकर, न्यूटन

विशेष लक्षवेधी अभिनेता - पंकज त्रिपाठी, न्यूटन

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री - श्रीदेवी ( मरणोत्तर) मॉम

सर्वोत्कृष्ट बॅकग्राऊंड स्कोअर - ए आर रेहमान, मॉम

सर्वोत्कृष्ट कोरिओग्राफर - गणेश आचार्य, लठ मार.. टॉयलेट एक प्रेमकथा

सर्वोत्कृष्ट अॅक्शन डिरेक्टर - अली अब्बास मुघल

सर्वोत्कृष्ट वीएफएक्स - बाहुबली - द कनक्लुजन

सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपट - बाहुबली द-कनक्लुजन

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 3, 2018 11:44 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close