काश्मिरमध्ये आहे शाहरुख खानचा डुप्लिकेट? जाणून घ्या काय आहे VIRAL फोटोमागचं सत्य

सध्या बॉलिवूड (Bollywood) बादशहा शाहरुख खानसारखा (Shah Rukh Khan) हुबेहुब दिसणारा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सेम टू सेम शाहरुखसारखा दिसणारा फोटोतील मुलगा काश्मिरी बॉय असल्याचं बोललं जात आहे.

सध्या बॉलिवूड (Bollywood) बादशहा शाहरुख खानसारखा (Shah Rukh Khan) हुबेहुब दिसणारा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सेम टू सेम शाहरुखसारखा दिसणारा फोटोतील मुलगा काश्मिरी बॉय असल्याचं बोललं जात आहे.

  • Share this:
    नवी दिल्ली, 15 डिसेंबर : फेसअ‍ॅप (Faceapp) हे अ‍ॅप वापरून आपल्या सध्याच्या फोटोवरून काही वर्ष आधी किंवा काही वर्ष नंतरचा फोटो तयार करता येतो. एखादा पुरुष असेल तर स्त्री रूपात आणि उलट प्रकारेही फोटो करता येतो. त्याशिवाय वय, केस, हास्य, फेस स्वॅप अशी अनेक फीचर्स त्यात असल्यानं त्याचा उपयोग करून फरक ओळखता येणार नाही असे फोटो तयार करता येतात. अनेक लोक आपली अगदी लहान वयातील किंवा म्हातारपणी आपण कसे दिसू याची झलक दाखवणारे हे फोटो तयार करून सोशल मीडियावर पोस्ट करत असतात. सध्या बॉलिवूड (Bollywood) बादशहा शाहरुख खानसारखा (Shah Rukh Khan) हुबेहुब दिसणारा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सेम टू सेम शाहरुखसारखा दिसणारा फोटोतील मुलगा काश्मिरी बॉय असल्याचं बोललं जात आहे. सेम शाहरुखसारखाच पण अगदी तरुण वयातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने, हा मुलगा कोण, त्याचं नाव काय, अशा चर्चेला उधाण आलं आहे. अवघ्या एक दोन दिवसात या फोटोने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला. पण या फोटो मागचं सत्य समोर आलं आहे. हा फोटो बनावट असून, तो फेसअ‍ॅपचा वापर करून तयार करण्यात आल्याचं स्पष्ट झालं आहे. 55 व्या कान्स फिल्म फेस्टीव्हलमधील (Cannes Film Festival) शाहरुख खानच्या फोटोचा वापर करून ‘टीन एज’ फिल्टर वापरून हा अगदी तरुण वयातील शाहरुखचा फोटो तयार करण्यात आला आहे. ट्विटरवर (Twitter) अनेक युजर्सनी हा फोटो पोस्ट केला आहे. अत्यंत झपाट्याने हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. लोकांनी हुबेहुब शाहरुखसारखाच दिसणारा फोटो फेसबुक आणि ट्विटरवर मोठ्या प्रमाणात पोस्ट केला आहे. कोणत्याही युजरने किंवा वेबसाईटने असा मुलगा अस्तित्त्वात असल्याचे पुरावे देण्याचा दावा केलेला नाही. त्यामुळे हा फोटो म्हणजे डिजिटल तंत्रज्ञानाची करामत आहे, असं बोललं जात आहे.
    Published by:Karishma Bhurke
    First published: