बाॅक्स आॅफिसवर रसिकांना 3 सिनेमांची ट्रीट

बाॅक्स आॅफिसवर रसिकांना 3 सिनेमांची ट्रीट

आज शुक्रवार. आज पुन्हा तीन सिनेमे बॉक्स ऑफिसवर दाखल झालेत. यात दोन हिंदी आणि एका मराठी सिनेमाचा समावेश आहे.

  • Share this:

मुंबई, 5 आॅक्टोबर : आज शुक्रवार. आज पुन्हा तीन सिनेमे बॉक्स ऑफिसवर दाखल झालेत. यात दोन हिंदी आणि एका मराठी सिनेमाचा समावेश आहे. आज रिलीज झालेला पहिला सिनेमा आहे अंधाधुंद.श्रीराम राघवन दिग्दर्शित या सिनेमात आयुष्यमान खुराना, तब्बू, राधिका आपटे यांच्या मुख्य भूमिका आहेत. एका अंध व्यक्तीच्या आयुष्यात घडणाऱ्या चित्रविचित्र घटनांवर हा सिनेमा आधारित आहे.

आज रिलीज झालेला दुसरा सिनेमा आहे लवरात्रीचं नाव बदलून रिलीज होणारा लवयात्री. सलमान खानचा मेव्हणा आयुष शर्मा आणि वारिना हुसैन यांच्या या सिनेमात मुख्य भूमिका आहेत.

सलमान खानचा सिनेमा 'लवरात्री'च्या नावावर बरेच वाद सुरू आहेत. मुजफ्फरनगर कोर्टात तर या सिनेमाविरोधात याचिकाही दाखल केली. सलमानची बहीण अर्पिताचा नवरा आयुष शर्माचा हा पहिलाच सिनेमा. त्यामुळे जास्त वाद होऊ नयेत म्हणून सलमाननं सिनेमाचं नावच बदललं.

त्याने तसं ट्विटही केलंय. आता या सिनेमाचं नाव 'लव्हयात्री' आहे. ट्विट करताना सलमान म्हणालाय, ही स्पेलिंग मिस्टेक नाहीय. लव्हयात्रीचं प्रमोशन सोशल मीडियावरच होत होतं.खानदानातील नवा हिरो डेब्यू करत असल्याने या सिनेमाला कसा प्रतिसाद मिळतो याची उत्सुकता आहेच.

मराठीत आज रिलीज होणारा सिनेमा आहे बॉईज २. बॉईज या सिनेमाच्या यशानंतर अवधूत गुप्तेने बॉईज टू प्रेक्षकांच्या भेटीला आणलाय. विशाल देवरूखकर दिग्दर्शित या सिनेमात पार्थ भालेराव, सुमंत शिंदे आणि प्रतिक लाड हे मुख्य भूमिकेत आहेत. त्यांच्यासोबत तीन हिरॉइन्सही या सिनेमात दिसणारेत. आता दोस्ती आणि मस्तीचा हा डबलडोस प्रेक्षकांना आवडतो का ते पहायचं.

VIDEO 'करिष्मानं माझ्याशी फक्त पैशासाठी लग्न केलं होतं'

First published: October 5, 2018, 11:13 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading