परिणितीनं असं पूर्ण केलं Bottlecapchallenge, हा व्हिडिओ एकदा पाहाच

हॉलिवूड नंतर आता बॉलिवूडमध्ये या Bottlecapchallenge चॅलेंजची क्रेझ वाढत आहे.

News18 Lokmat | Updated On: Jul 6, 2019 12:15 PM IST

परिणितीनं असं पूर्ण केलं Bottlecapchallenge, हा व्हिडिओ एकदा पाहाच

मुंबई, 6 जुलै : सध्या बॉलिवूडमध्ये #Bottlecapchallenge क्रेझ आहे. अभिनेता अक्षय कुमार पाठोपाठ सिद्धार्थ मल्होत्रा आणि टायगर श्रॉफ, विद्युत जामवाल अशा अनेक बॉलिवूड कलाकारांनी हे चॅलेंज पूर्ण केलं. हॉलिवूड नंतर आता बॉलिवूडमध्ये या चॅलेंजची क्रेझ वाढत आहे. पण सध्या बॉलिवूडमध्ये असा एक वर्ग आहे ज्यांनी विनोदी स्टाइलमध्ये हे चॅलेज पूर्ण केलं. मराठीतील स्वप्नील जोशी, अमृता खानविलकर. बॉलिवूडमधील सुनील ग्रोवर, कुणाल खेमू यांनी त्यांच्या हटके स्टाइलमध्ये हे चॅलेंज पूर्ण केलं. ज्यात आता अभिनेत्री परिणिती चोप्राचा समावेश झाला आहे.

परिणिती चोप्रानं काही दिवसांपूर्वीच तिचा आगामी सिनेमा ‘जबरिया जोडी’चं शूटिंग पूर्ण केलं असून सध्या ती भारताची स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवालच्या बायोपिकचा तयारी करत आहे. बॉलिवूडमध्ये सध्या सर्वाधिक चर्चेत असलेलं #Bottlecapchallenge परिणितीनं सुद्धा पूर्ण केलं असून तिनं याचा व्हिडिओ तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या पोस्टमध्ये परिणितीनं अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रालाही टॅग केलं असून कॅप्शनमध्ये ‘Sidoooo हे माझं व्हर्जन आहे’ असं लिहिलं आहे. यावर सिद्धार्थनं सुद्धा, ‘सुपर, दुसऱ्या सिनेमाचंही जबरिया प्रमोशन’ अशी कमेंट करून दिला दाद दिली आहे.

हृतिक आणि तापसीनंतर आता दीपिका पदुकोण रंगोली चंडेलच्या निशाण्यावर

Loading...

 

View this post on Instagram

 

Sidoooo this is my version! @sidmalhotra #BottleCapChallenge #KHADKEGLASSY OUT NOW!

A post shared by Parineeti Chopra (@parineetichopra) on

बॉलिवूडमध्ये सर्वात अगोदर अक्षय कुमारनं हे #Bottlecapchallenge पूर्ण केलं. त्यानंतर टायगर श्रॉफ आणि सिद्धार्थ मल्होत्रा, विद्युत जामवाल या बॉलिवूड कलाकारांनी या चॅलेंजचे व्हिडिओ त्यांच्या सोशल मीडियावर शेअर केले. 2018 मध्ये आलेल्या किकी चॅलेंज नंतर आता आलेल्या या बॉटलकॅप चॅलेंजनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या चॅलेंजमध्ये पायाच्या सहाय्यानं बॉटलचं झाकण काढायचं असतं. यामध्ये योग्य समतोल आणि फिटनेस खूप महत्त्वाचा असतो.

वाढदिवसाच्या निमित्तानं रणवीरकडून चाहत्यांना मिळालं ‘हे’ खास गिफ्ट

==========================================================

SPECIAL REPORT: सोशल मीडियावर व्हायरल होणारं बॉटल कॅप चॅलेज काय आहे?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 6, 2019 11:07 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...