Home /News /entertainment /

Boss Mazi Ladachi: पिझ्झा पास्ता सोडा; 'बॉस माझी लाडाची' च्या सेटवर 'हा' पदार्थ बघून कलाकार होतात खुश!

Boss Mazi Ladachi: पिझ्झा पास्ता सोडा; 'बॉस माझी लाडाची' च्या सेटवर 'हा' पदार्थ बघून कलाकार होतात खुश!

बॉस माझी लाडाची मालिकेच्या सेटवर जेवणाच्या वेळी धमाल होताना दिसते. यावेळेला कलाकार नेमकं काय करतात माहित आहे का?

  मुंबई 25 जून: (Sony Marathi) सोनी मराठीवरील ‘बॉस माझी लाडाची’ (Boss Mazi Ladachi) मालिकेची सध्या बरीच क्रेझ आहे. या मालिकेने नुकतेच शंभर भाग पूर्ण केले. खडूस बॉस राजेश्वरी आणि सांभाळून घेणारा एम्प्लॉई मिहीरची लव्हस्टोरी पाहायला प्रेक्षकांना जाम मजा येत आहे. तुम्हाला माहित आहे का? या मालिकेच्या सेटवर एक खास पद्धत पाळली जाते आणि जेवणाचे शौकीन असणाऱ्या सगळ्या मंडळींना एका खास पदार्थाची आवड सुद्धा आहे. बॉस माझी लाडाची मालिकेच्या सेटवर सगळे गुण्यागोविंदाने काम करतात आणि सोबत वेळ सुद्धा घालवतात. या मालिकेच्या सेटवर सगळ्यांनी एकत्र बसून जेवायची एक पद्धत आहे आणि सगळेच आनंदाने कुटुंबासारखं जेवायला बसतात. याबद्दल मालिकेतील मुख्य पात्र साकारणारी भाग्यश्री लिमयेने (Bhagyashree Limaye) एका मुलाखतीत खास माहिती दिली. भाग्यश्री राजश्री मराठीशी बोलताना तिच्या लंचबद्दल, खाण्यापिण्याच्या आवडीबद्दल सांगत होती. “मला पिझ्झा-पास्तापेक्षा घरचं जेवण आवडत. आणि विशेष म्हणजे सेटवर आम्ही सगळेच एकमेकांना असे सापडलो आहोत ज्यांना मराठी जेवण विशेषतः घरचं जेवण फार आवडतं. आमच्या सेटवर अप्रतिम जेवण आहे. आमच्या सिरियलची खासियत आहे की आमचं जेवण एकदम पौष्टिक आणि घरचं असतं. सेटवर सगळ्यांनाच भारतीय पदार्थ जास्त आवडतात. म्हणजे पिझ्झा पास्ता पेक्षा उसळ असेल की आम्ही एकदम एक्ससाईट होतो आणि अगदी उड्या मारत तुटून पडतो. आमच्यासाठी लन्च टाइम खूप महत्त्वाचा असतो. आम्ही खूप गप्पा मारतो, एकत्र बसून जेवतो.”
  भाग्यश्री आणि आयुष हे दोघे यंग आणि फ्रेश चेहरे या मालिकेत दिसत आहेत. या दोघांची कधी गोड कधी तिखट प्रेमकहाणी पाहायला चाहत्यांना मजा येत आहे. मालिकेच्या सेटवर सगळेच धमाल करत काम करत असतात. अनेकदा कलाकार स्वतः भाग्यश्री सुद्धा त्यांची ही ऑफ स्क्रीन धमाल (Bhagyashree Limaye Instagram) आपल्या चाहत्यांसोबत शेअर करताना दिसते. हे ही वाचा- Veena Jagtap: वीणा जगतापची सेटवरची बेस्ट फ्रेंड आहे 'ही' अभिनेत्री, पाहा हा खास video या मालिकेत सध्या नव्या नव्या लग्न झालेल्या राजू आणि मिहीरची होणारी तारांबळ आणि नकल्प्ने जडलं जाणारं प्रेम पाहायला मिळत आहे. आता राजेश्वरी आणि मिहीर एकमेकांना प्रेमाची कबुली कधी देतात हे पाहणं महत्त्वाचं आहे.
  Published by:Rasika Nanal
  First published:

  Tags: Marathi entertainment, Tv actress, Tv celebrities, Tv serial

  पुढील बातम्या