आयपीएल सट्टेबाजीत अरबाजच्या नंतर साजिद खानही अडकला ?

आयपीएल सट्टेबाजीत अरबाजच्या नंतर साजिद खानही अडकला ?

आयपीएल सट्टेबाजीत सोनू जलानचा मोठा खुलासा, दिग्दर्शक साजिद खानही लावतो सट्टा

  • Share this:

मुंबई, ता. 05 जून : आयपीएल सट्टेबाजीत बॉलिवूडचा अभिनेता अरबाज खाननंतर प्रसिद्ध दिग्दर्शक साजिद खान याचंही नाव आता समोर आलं आहे. एएनआईच्या माहितीनुसार, सोनू जलानच्या सांगण्यानुसार साजिद खान 7 वर्षांआधी क्रिकेटमध्ये सट्टा लावायचा. सोनूच्या या सांगण्यावरून ठाणे पोलीस आता याचा तपास करत आहेत. पण अद्याप पोलिसांकडून साजिद खानला नोटिस पाठवण्यात आलेली नाही.

दोन दिवसांआधीच अरबाज खानने मी 6 वर्षांपासून क्रिकेटमध्ये सट्टेबाजी करत असल्याची कबूली चौकशी दरम्यान दिली. मागच्या वर्षीच्या आयपीएल सट्टेबाजीत त्याला 2 कोटी 75 लाखांचा फटका बसला होता पण त्यानंतर सोनू जलानच्या मदतीने अनेक सामने जिंकलेही होते.

दरम्यान, सट्टेबाजी प्रकरणात मी पोलिसांनी प्रामाणिकपणे मदत करणार असल्याच अरबाजने क्राईम ब्रांचच्या चौकशीत सांगितलं. सुत्रांच्या माहितीनुसार, चौकशीत आणखी 15 जणांची नावं समोर आली आहे जे आयपीएलमध्ये मोठे सट्टेबाज आहेत.

कोण आहे सोनू जालान ?

- 42 वर्षांचा बुकी, देशात आणि देशाबाहेर सट्टाबाजार चालवतो

- यंदाच्या आयपीएलमध्ये सोनू जालाननं 10 कोटी नफा कमावला

- सोनूचे अरबाज खानसोबतचे फोटो पोलिसांना सापडले

- अरबाज खाननं सोनूच्या मार्फत आयपीएलमध्ये सट्टा लावल्याची माहिती

- अरबाज खान लाखो रुपये बेटिंगमध्ये हरला होता

- सोनूच्या यादीत अनेक अभिनेते, अभिनेत्री, उद्योगपतींची नावं असल्याचा संशय

- सोनू काही आयपीएल खेळाडू आणि निवृत्त खेळाडूंच्या संपर्कात होता

- 2008 मध्ये पहिल्यांदा सोनू जालानला अटक

हेही वाचा !

सट्टेबाजीत अरबाज खाननंतर समोर आली आणखी दोन निर्मात्यांची नावं

...म्हणून सलमान मारायला धावला होता अरबाजला !

सट्टेबाजीवरून अरबाज-मलाईकात व्हायची भांडणं अखेर झाला काडीमोड

याच मशीनवरून अरबाजने लावला सट्टा, पहा हा एक्सक्लुझिव्ह VIDEO

अरबाज 6 वर्षांपासून लावतो सट्टा, मागच्या वर्षी झालं इतकं नुकसान

अरबाजचा खळबळजनक खुलासा, बॉलिवूडचा मोठा निर्माताही लावतो सट्टा

आयपीएलचं बॉलिवूड कनेक्शन, बेटिंग प्रकरणी अरबाज खानला नोटीस

First published: June 5, 2018, 9:06 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading