Book Review : दहशतवादाचे राजकारण का हिंदुत्वाचे राजकारण ?

हिंदू दहशतवाद हा शब्द आला कुठून? यावर आधारित आता पुस्तक देखील तुमच्या भेटीला आलं आहे.

News18 Lokmat | Updated On: Apr 17, 2019 07:35 PM IST

Book Review : दहशतवादाचे राजकारण का हिंदुत्वाचे राजकारण ?

मुंबई, 16 एप्रिल : ब्लूम्सबेरी प्रकाशित ‘आतंक से समझौता' हिंदू दहशतवाद यावर रचलेले खोटे आणि वेगळेच राजकारण हाताळणारे हिंदी पुस्तक आहे. या पुस्तकाचे लेखक दिल्ली इथे स्थायिक झालेले इंदौरचे वरिष्ठ पत्रकार डॉ. प्रवीण तिवारी आहेत.वर्ष २००६च्या मालेगांव येथील बॉम्बस्फोटानंतर भारतात हिंदू दहशतवाद दिसायला लागला. जरी या सगळ्याचे सूत्रधार सीमी संघटना असल्याचे दिसत असले तरी हे राजकारण वेगळेच होते. सीमीच्या अतिरेक्यांचे नार्को परीक्षण झाले आणि तपासाची दिशाच बदलली.


या पुस्तकात कर्नाटक एफएसएलचे पूर्व निदेशक डॉ. बी. एम. मोहन यांची विशेष मुलाखत आहे. त्यात नार्को टेस्टमध्ये सिमीच्या अतिरेक्यांनी दिलेले कबुली जवाब आहेत. ज्यांना नंतर हिंदू दहशतवादच्या नावाखाली वेगळेच रूप देण्यात आले. अजमेर शरीफ आणि समझौता ब्लॉस्ट विषयी तत्कालीन यूपीए सरकारच्या तपासाविषयी पण शंका आणि प्रश्न उभे केले आहेत. ज्याठिकाणी पुस्तकात गंभीर प्रश्न आहेत. तिथेच महत्वपूर्ण पुरावे हे सिद्ध करतात कि भगवा दहशतवाद हे विचारपूर्वक ठरवलेले राजकारणच होते.


पुस्तकात मीडिया, सरकार आणि तपास खाते यांच्यात एकी दिसून येते. 26/11 मुंबई दहशतवादी हल्ला आणि तत्कालीन गृहमंत्री पी. चिदंबरम यांची त्यात असलेली साशंक भूमिका यावर चर्चा आहे. तत्कालीन जॉईंट इंटेलिजन्स कमिटीचे माजी निदेशक डॉ. बी.डी. प्रधान यांची विशेष मुलाखत वाचायला मिळते. हे पुस्तक वाचल्यावर लक्षात येते की, भाजपची हिंदूवादी छबी हिंदू दहशतवाद करण्यामागचे नक्की राजकारण कसे असेल? एकाच वेळी अनेक ब्लास्ट का झाले असावे? आणि ते दहशतवाद या नावाखाली जनसामान्यात पसरवले गेले असावे? पुस्तकात अनेक व्यक्ती आणि त्यांची ओळख गोपनीय ठेवण्यात आली आहे. तर, कुठे काही विषयांना निर्भयतेने मांडले आहे. भगवा दहशतवाद या विषयावरील हे आगळे वेगळे पुस्तक असून वाचकांना राजकारण आणि सिस्टिमकडे बघण्याचा वेगळे दृष्टिकोन देणारे ठरेल.


एक टेलिव्हिजन पत्रकार म्हणून डॉ. प्रवीण तिवारी स्वतः काही घटनांचे साक्षीदार आहेत. याचे पुरावे पुस्तकात दिसून येतात. हे पुस्तक इंग्रजीमध्ये The Great Indian Conspiracy या नावाने उपलब्ध आहे.


( राजश्री पी. चितळे यांनी हे पुस्तक परिक्षण केलं आहे. )


पुस्तक : आतंक से समझौता

इंग्रजी आवृत्ती : The Great Indian Conspiracy

प्रकाशक : ब्लूम्सबेरी

लेखक : डॉ. प्रवीण तिवारी

मूल्य : हिंदी आवृत्ती -399 रुपये

इंग्लिश आवृत्ती - 499 रुपये

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 16, 2019 06:09 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close