जान्हवी-इशानच्या नात्याबाबत 'हे' आहे वडील बोनी कपूर यांचं मत

जान्हवी-इशानच्या नात्याबाबत 'हे' आहे वडील बोनी कपूर यांचं मत

इशान अनेकदा जान्हवीला भेटायला तिच्या घरी जात असल्याचं तसेच बोनी कपूर सुद्धा इशांतला पसंत करत असल्याचं बोललं जातं.

  • Share this:

मुंबई, 30 जुलै : अभिनेत्री जान्हवी कपूर आणि इशान खट्टर यांनी मराठी सिनेमा ‘सैराट’चा हिंदी रिमेक ‘धडक’मध्ये एकत्र कामम केलं होतं. जान्हवीनं या सिनमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. या सिनेमा हिट झाला आणि इशान सोबतची तिची केमिस्ट्री खूप गाजली. यासोबतच त्यांच्या अफेअरच्या चर्चा सुरू झाल्या. या दोघांनीही यावर कधीच उघडपणे काहीही बोललं नसलं तरी आता जान्हवीचे वडील बोनी कपूर यांनी या दोघांच्या नात्यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

जान्हवी आणि इशाननं नेहमीच आम्ही दोघंही एकमेकांचे खूप चांगले मित्र असल्याचं सांगतात. त्यांची ही मैत्री सिनेमा साइन करायच्या आधीपासूनची असल्याचंही त्यांनी अनेकदा म्हटलं आहे. अशातच इशान अनेकदा जान्हवीला भेटायला तिच्या घरी जात असल्याच्या चर्चा सुरू होत्या. तसेच बोनी कपूर सुद्धा इशांतला पसंत करत असल्याचं बोललं जात होतं. मात्र याबाबत वडील बोनी कपूर यांना विचारण्यात आल्यानंतर त्यांनी मात्र या सर्व अफवा असल्याचं म्हणत धडकच्या रिलीजनंतर इशान कधीच आमच्या घरी आलेला नाही हे स्पष्ट केलं.

डोक्याला शॉट! 'प्लीज फोन करू नका, मी सनी लिओनी नाही'

 

View this post on Instagram

 

❤️

A post shared by Ishaan (@ishaankhatter) on

बोनी कपूर म्हणले, ‘हो जान्हवी आणि इशान खूप चांगले मित्र आहेत पण ते खूप आधीपासून मित्र होते. मात्र या सिनेमा दरम्यान त्याच्यातील मैत्री आणखी घट्ट झाली. मी त्यांच्या मैत्रीचा आदर करतो. हा सिनेमा रिलीज झाल्यानंतर तो आमच्या घरी आलेला नाही. त्या दोघांमध्ये मैत्री पेक्षा जास्त कोणतही नातं नाही.’

अनुष्का शर्मानं प्रेग्नेंसीच्या चर्चांवर सोडलं मौन, म्हणाली...

 

View this post on Instagram

 

A post shared by Ishaan (@ishaankhatter) on

काही दिवसांपूर्वी जान्हवी आणि इशान पुन्हा एकदा एकत्र दिसणार असल्याचं बोललं जात आहे. करण जोहर डियर कॉमरेडचा हिंदी रिमेक बनवणार असून या सिनेमासाठी तो जान्हवी आणि इशानला साइन करण्याच्या विचारात असल्याचा अंदाज आहे. जान्हवीच्या वर्कफ्रंटबाबत बोलायचं तर ती लवकरच ती ‘तख्त’, ‘दोस्ताना 2’, ‘कारगिल गर्ल’, ‘रुही अफ्जा’ या सिनेमात दिसणार आहे.

दाऊदच्या जवळीकीमुळे सर्वस्व गमावलं, आज सर्वांपासून दूर आहे राज कपूर यांची ‘गंगा’

==============================================================

आला रे आला..गुजराती 'सिंबा' आला, खऱ्या पोलिसाचा VIDEO तुफान व्हायरल

Published by: Megha Jethe
First published: July 30, 2019, 2:57 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading