श्रीदेवींची झाली होती हत्या, DGP च्या या दाव्यावर पती बोनी कपूरने दिली प्रतिक्रिया

श्रीदेवींची झाली होती हत्या, DGP च्या या दाव्यावर पती बोनी कपूरने दिली प्रतिक्रिया

ऋषिराज सिंह यांनी लिहिलेल्या लेखानुसार, 'कोणाचाही एखाद्या बाथटबमध्ये बुडून मृत्यू होणं शक्य नाही. कारण त्या बाथटबमध्ये अगदी फिट बसत होत्या.

  • Share this:

मुंबई, 12 जुलै- श्रीदेवी यांच्या मृत्यूला दुबई पोलिसांनी बुडून अपघाती मृत्यू मानलं असलं तरी डीजीपी ऋषीराज सिंह यांनी श्रीदेवी यांचा मृत्यू अपघाती नसून ती एक हत्या होती असा धक्कादायक खुलासा केला. त्यांच्या या वक्तव्यामुळे अनेकांना आश्चर्यवाटले. दरम्यान श्रीदेवी यांचे पती बोनी कपूर यांनी आता या संपूर्ण प्रकरणावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. बोनी यांना जेव्हा पत्रकारांनी या संपूर्ण प्रकरणावर आपलं मत देण्यास सांगितलं तेव्हा बोनी यांनी अशा तर्थहिन गोष्टींवर त्यांना कोणतीही प्रतिक्रिया द्यायची नाही असं म्हटलं. तसेच अशा गोष्टी समोर येतच राहणार त्यामुळे निरर्थक गोष्टींवर बोलण्यात काहीच अर्थ नसल्याचं बोनी म्हणाले.

 

View this post on Instagram

 

❤️❤️❤️❤️❤️❤️

A post shared by Sridevi Kapoor (@sridevi.kapoor) on

डीजीपी ऋषीराज सिंह यांनी आपल्या कॉलममध्ये लिहिले की, त्यांचे एक मित्र फॉरेंसिक एक्सपर्ट आहेत. त्यांनी श्रीदेवी यांच्या मृत्यू प्रकरणात अनेक गोष्टींचा जवळून अभ्यास केला. यावरून त्यांचा आकस्मित मृत्यू झाला नसून श्रीदेवी यांची हत्या करण्यात आल्याचं दिसतं. तसेच ते पुढे म्हणाले की, श्रीदेवी यांनी मद्यपान केलं असलं तरीही त्यांचा बुडून मृत्यू होऊ शकत नाही. याचं स्पष्टीकरण देताना ते म्हणाले होते की, एक फूटच्या बाथटबमध्ये कोणी कसं बुडू शकतं.

श्रीदेवींच्या मृत्यूवेळी खोलीत आणखी कोणी होतं?

ऋषिराज सिंह यांनी लिहिलेल्या लेखानुसार, 'कोणाचाही एखाद्या बाथटबमध्ये बुडून मृत्यू होणं शक्य नाही. कारण त्या बाथटबमध्ये अगदी फिट बसत होत्या. त्यांनी दावा केली की, श्रीदेवींचे दोन्ही पाय पकडले होते आणि त्यानंतर त्यांचं डोकं पाण्यात घालून त्यांना मारण्यात आलं.' ऋषिराज सिंह यांनी लेखातून केलेल्या या दाव्यामुळे एकच खळबळ उडाली.

राधिका आपटे आणि देव पटेलचा लव्ह सीन झाला लीक

Sacred Games Season 2 : शाळेत दोनदा नापास झालेला 'बंटी', एका रात्रीत बदललं नशीब

VIDEO दोन्ही हात नाहीत, तरी Indian Idon गाजवलं, आता सलमानबरोबर गायलं 'हे' गाणं

आता अनुष्काच्या मागे लागले युझर, सुई धागाच्या जाळ्यात अडकला विराट कोहली

SPECIAL REPORT : धोनी भावूक झाला आणि चाहत्यांचा बांध फुटला

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 12, 2019 07:40 PM IST

ताज्या बातम्या