मलायकामुळे सलमानसोबतचं नातं बिघडलं? बोनी कपूर यांचा धक्कादायक खुलासा

नुकत्याच दिलेल्या एक मुलाखतीत सलमान खानसोबत आपल्या बिघडलेल्या नातेसंबंधांवर बोनी कपूर पहिल्यांदाच बोलले.

नुकत्याच दिलेल्या एक मुलाखतीत सलमान खानसोबत आपल्या बिघडलेल्या नातेसंबंधांवर बोनी कपूर पहिल्यांदाच बोलले.

 • Share this:
  मुंबई, 16 फेब्रुवारी : अभिनेता सलमान खान आणि बोनी कपूर एकेकाळी एकमेकांचे चांगले मित्र होते. दोघांनी एकत्र वॉन्टेड आणि नो एंट्री सारखे हिट सिनेमा दिले आहेत. पण 2009 मध्ये वॉन्टेड सिनेमामध्ये काम केल्यानंतर दोघांनी पुन्हा कधीच एकत्र काम केलं नाही. नुकत्याच दिलेल्या एक मुलाखतीत सलमान खानसोबत आपल्या बिघडलेल्या नातेसंबंधांवर बोनी कपूर पहिल्यांदाच बोलले. यावेळी त्यांनी स्पष्टपणे मलायकाचं नाव न घेता हे तिच्यामुळे हे संबंध बिघडल्याचं मान्य केलं. IANS दिलेल्या मुलाखतीत बोनी कपूर यांनी मुलगा अर्जुन कपूरचं फिल्मी करिअर आणि सलमानसोबतच्या नात्याबद्दल चर्चा केली. ते म्हणाले, ‘अर्जुनला सुरुवातीपासूनच दिग्दर्शन करायचं होतं. त्यामुळे त्याला अभिनेता म्हणून लॉन्च करण्याचा कोणताही प्लान मी कधीच केला नव्हता. पण एक दिवस मला सलमाननं कॉल केला आणि म्हणाला अर्जुननं एकदा तरी अभिनयात स्वतःला आजमावून पाहायला हवं. कारण त्याच्यात अभिनेत्याकडे असायला हवे असे सर्व गुण आहेत.’ दिशा पाटनीनं केली टायगरची कॉपी, सोशल मीडियावर बॅक फ्लिपचा VIDEO VIRAL
   
  View this post on Instagram
   

  Subah ki coffee aur sooraj!

  A post shared by Salman Khan (@beingsalmankhan) on

  बोनी कपूर पुढे सांगतात, ‘अर्जुनला अभिनेता होण्यासाठी सलमान खूप मेहनत घेतली होती. त्यानंच त्याला गाइड केलं आणि त्यानंच त्याला ग्रुम सुद्धा केलं. दुर्दैवान आता माझे आणि सलमानचे वैयक्तिक संबंध चांगले नाही. पण सलमान अशी व्यक्ती आहे ज्यानं अर्जुनला बॉलिवूडमध्ये येण्यासाठी सर्वाधिक प्रोत्साहन दिलं आहे. सलमानचे हे उपकार माझ्यावर कायम राहतील.’ मराठमोळ्या अभिनेत्रीला मिळाला Filmfare Award, पाहा यंदा कोणी मारली बाजी
   
  View this post on Instagram
   

  ♥️

  A post shared by Arjun Kapoor (@arjunkapoor) on

  बोनी कपूर यांनी स्पष्टपणे काही बोललं नसलं तरीही त्यांच्या बोलण्याचा रोख मलायकाकडे होता हे स्पष्ट होतं. अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा यांची लव्ह स्टोरी सुरू झाल्यावर बोनी कपूर आणि अर्जुन कपूर यांचे सलमान खानशी असलेले मैत्रीचे संबंध बिघडले. सुत्रांच्या माहितीनुसार अर्जुन कपूरसोबतच्या नात्यामुळेच मलायका अरोरा आणि अरबाज खान यांचा संसार तुटला. त्यानंतर म्हणजे 2019 मध्ये या दोघांनी त्यांचं नातं ऑफिशिअल केलं. तर अरबाज खान सुद्धा मॉडेल जॉर्जियासोबत रिलेशनशिपमध्ये आहे. Bigg Boss 13 सिद्धार्थ शुक्लाच्या नावावर, मिळवलं एवढ्या लाखांचं रोख बक्षीस
  First published: