मुंबई, 24 नोव्हेंबर: अभिनेत्री कंगना रणौतला (Kangana Ranaut) मुंबई हायकोर्टाने दिलासा दिला आहे. सोशल मीडियावरील आक्षेपार्ह पोस्ट आणि समजात तेढ निर्माण करणारी वक्तव्य केल्याच्या आरोपाखाली कंगना आणि तिची बहीण रंगोली (Rangoli) विरोधात वांद्रे पोलीस स्थानकामध्ये गुन्हा नोंदवला होता. पोलिसांनी याप्रकरणी तिला समन्सही बजावले होते. ही तक्रार मागे घेण्यासाठी कंगना रणौतने मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली होती. न्यायालयाने तिला आणि तिच्या बहिणीला अटकेपासून अंतरिम संरक्षण दिलं आहे. तसंच 8 जानेवारी 2021पर्यंत कोर्टाने मुंबई पोलिसांना कोणतीही काररावाई न करण्याचे आदेश दिले आहेत. कंगना आणि तिच्या बहिणीविरोधात वांद्रे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. कंगना आणि तिची बहीण रंगोली चंदेल हिच्यावर दोन समाजात तेढ निर्माण करणे, धार्मिक द्वेष पसरवल्याचा आरोप करण्यात आला होता.
नेमकं प्रकरण काय?
बॉलिवूडमधील फिटनेस ट्रेनर मुनव्वर अली सय्यद यांनी कोर्टात याचिका दाखल केल्यानंतर कोर्टाने कंगनाविरूद्ध तक्रार दाखल करण्यात आली होती. न्यायायलाच्या आदेशानुसार वांद्रे पोलिसांनी कंगनाविरोधात भादवी कलम कलम 153 ए (धर्म, वंश इत्यादींच्या आधारावर विविध गटांमध्ये कलह वाढवणे), 295 ए (धार्मिक भावना दुखावण्याच्या हेतुपुरस्सर कृत्य) आणि 124-ए (देशद्रोह) आणि 34 अंतर्गत एफआयआर दाखल केली होती.
#UPDATE | Bombay High Court directs actor Kangana Ranaut and her sister Rangoli Chandel to appear before the police on January 8; asks the police not to take any action against them till then. https://t.co/CTL1eP5ddZ
— ANI (@ANI) November 24, 2020
कामाच्या बाबतीत बोलायचं झालं तर, कंगना रणौतच्या भावाचं लग्न नुकतंच पार पडलं आहे. आता ती 'थलायवी' सिनेमाच्या शूटिंगसाठी दक्षिण भरातात गेली आहे.