सकाळी मराठी मालिकांमध्ये काम तर रात्री पोटासाठी ही अभिनेत्री चालवते रिक्षा

सकाळी मराठी मालिकांमध्ये काम तर रात्री पोटासाठी ही अभिनेत्री चालवते रिक्षा

बोमन इराणी सारख्या मोठ्या अभिनेत्याला भेटल्याचा आनंद त्यावेळी तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता.

  • Share this:

मुंबई, 2 मे : बॉलिवूड अभिनेता बोमन इराणी त्यांच्या सिनेमांव्यतिरिक्त सोशल मीडियावर फार कमी चर्चेत असतात. पण नुकत्याच त्यांनी शेअर केलेल्या महिला रिक्षा चालकाच्या एका व्हिडिओमुळे सगळीकडे त्यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. ही रिक्षा चालक कोणी साधी महिला नाही तर ती मराठी मालिकेतील अभिनेत्री आहे. या अभिनेत्रीचं नाव लक्ष्मी असं असून ती अभिनयाव्यतिरिक्त रिक्षा चालवण्याचं कामही करते. त्यामुळे सोशल मीडियावर तिचं खूप कौतुक होत आहे.

बोमन इराणी नुकतेच लक्ष्मीला भेटले त्यावेळी ती रिक्षा चालवत होती. तिच्यासोबत बोमन इराणी यांनी रिक्षातून फेरफटका मारला आणि तिच्या सोबतच्या भेटीचा एक व्हिडिओ त्यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. ज्यात ते लक्ष्मीचं कौतुक करताना दिसत आहेत. बोमन इराणी यांनी या महिलेला 'सुपर लेडी' म्हटलं आहे. याशिवाय ते लक्ष्मीची ओळख करून देताना दिसत आहेत. बोमन इराणी यांनी हा व्हिडिओ शेअर करताना लिहिलं, 'भेटा, या सुपर लेडी लक्ष्मीला. ती मराठी मालिकेतील अभिनेत्री आहे. तसेच ती एक चांगली रिक्षा चालकही आहे. ती आयुष्यातील खरी नायिका आहे. तुम्हालाही तिच्या रिक्षात बसण्याची संधी मिळेल अशी आशा करतो. तिच्याकडे उर्जेच भांडार आहे.'

प्रियांका चोप्राच्या भावाचं लग्न दुसऱ्यांदा मोडलं, Instagram वरच्या 'या' फोटोंमुळे झालं उघड

या व्हिडिओमध्ये बोमन इराणी म्हणतात, 'लक्ष्मी मला तुझा आभिमान वाटतो.' यावेळी लक्ष्मीच्या चेहऱ्यावर आनंद ओसांडून वाहत असलेला दिसत आहे. एवढ्या मोठ्या अभिनेत्याला भेटल्यावर तिला झालेला आनंद तिला शब्दात मांडता आला नाही आणि ती भावूक झालेली पाहायाला मिळत आहे. बोमन इराणी लवकरच ओमंग कुमार दिग्दर्शित पीएम नरेंद्र मोदी बायोपिक मध्ये दिसणार आहेत. या सिनेमात ते प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांची व्यक्तिरेखा साकारत आहे. मात्र निवडणू आयोगानं लावलेल्या बंदीमुळे 5 एप्रिलला रिलीज होणारा हा सिनेमा आता 24 मे ला लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर रिलीज होणार आहे.

गरोदर गर्लफ्रेंडला क्लीनिकमध्ये घेऊन गेला अर्जुन कपूर, दरदिवशी अशी घेतो काळजी

टायगर श्रॉफसोबत पहिल्या ऑनस्क्रीन किसच्या प्रश्नावर अनन्या पांडेनं दिलं 'हे' उत्तर

First published: May 4, 2019, 3:22 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading