मुंबई 1 जुलै: हिंदीतील एक कुशल अभिनेता म्हणून बोमन इराणी (Boman Irani) यांचं नाव घेतलं जातं. बोमन इराणी गेली अनेक वर्ष आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ पाडत आहेत. दादरच्या पारसी कॉलनीतून बोमन यांनी पावसाचा आनंद लुटतानाचा एक खास विडिओ शेअर केला आहे.
दादरच्या पारशी कॉलनीत स्थायिक असणारे बोमन यांनी बराच उशिरा बॉलिवूडमध्ये डेब्यू केला. त्याआधी ते एका बिस्कीट आणि फरसाणाच्या दुकानात काम करायचे तसंच त्यांनी वेटर म्हणून सुद्धा याआधी काम केलं आहे. त्यांचा सगळं जीवनकाल त्यांनी मुंबईतच घालवला आहे त्यामुळे त्यांचं या शहराशी एक खास नातं आहे. मुंबई आणि पावसाचं अतूट नातं आहे. एरवी पावसाने मुंबईची कितीही तुंबई केली तरी (Mumbai Rain) सुरुवातीचा पाऊस हा मुंबईकरांना सुखावणारा असतो. अशाच एका हाडाच्या मुंबईकराने एकदम हटके पद्धतीने पावसाच्या येण्याच्या आनंदात आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
बोमन इराणी इन्स्टाग्रामवर (Boman Irani instagram) सुद्धा ऍक्टिव्ह असतात. बोमन इराणी यांनी तुफान पावसात एक खास विडिओ शेअर करत काही आठवणींना उजाळा दिला आहे. ‘हा पाऊस बघून लहानपण आठवलं. आम्ही असेच लहानपणी शाळेत जायचो. हा माझा घरचा परिसर आहे जो अख्खा पाण्याने भरला आहे.’ असं म्हणत बोमन आपल्या घरचा परिसर दाखवतात. ते त्यांच्या वॉचमनची सुद्धा ओळख करून देतात आणि त्याच्याशी चक्क मराठीत संवाद साधतात. ‘हो मी लवकर आलो’ असं ते वॉचमनला सांगतात. त्यानंतर बोमन इराणी चक्क मराठीत कविता म्हणत आपला आनंद व्यक्त करताना सुद्धा यात दिसत आहेत. ‘ये रे ये रे पावसा, तुला देतो पैसा’ ही कविता म्हणत बोमन इराणी पावसाचा आनंद लुटताना दिसत आहेत.
सध्या वर्क फ्रंटवर बोमन इराणी ‘मासूम’ या डिजनी प्लस हॉटस्टारवरच्या एका अप्रतिम कलाकृतीत दिसून आले. त्यांच्या अभिनयाचं आणि भूमिकेचं खूप कौतुक होताना दिसत आहे.
Published by:Rasika Nanal
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.