मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

मागील वर्षी कंगनाने भरला अर्धाच टॅक्स; कर न भरण्याचं दिलं हे कारण

मागील वर्षी कंगनाने भरला अर्धाच टॅक्स; कर न भरण्याचं दिलं हे कारण

Bollywood News:बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौतने (Kangana ranaut) मागील वर्षी अर्धाच टॅक्स भरला आहे. टॅक्स भरायला उशीर का झाला? याचं कारणही तिने इन्स्टाग्राम पोस्टमध्ये दिलं आहे.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 09 जून: बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत (Kangana ranaut) नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणावरून चर्चेत असते. विविध सामाजिक आणि राजकीय मुद्यांवर तिने दिलेल्या प्रतिक्रियांमुळे अनेकदा वाद झाले आहेत. यामुळे तिला अनेकवेळा ट्रोलचा सामनाही करावा लागला आहे. अलीकडचे ट्विटरने कंगनावर कारवाई करत तिचं ट्विटर अकाऊंट संस्पेंड केलं आहे. यानंतर कंगना आता वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आली आहे. खरंतर यावर्षी तिला टॅक्स भरायला उशीर झाला (become Late to pay tax) आहे. याबाबतची माहिती तिने स्वतः आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून दिली आहे.

यावेळी कंगनाने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक स्टोरी अपलोड केली आहे. ज्यामध्ये तिने म्हटलं आहे की, 'मी बॉलिवूडमधील सर्वाधिक टॅक्स भरणारी अभिनेत्री आहे. मी माझ्या उत्पन्नाच्या जवळपास 45 टक्के टॅक्स भरते. पण मागील वर्षी हाताला काम नसल्याने टॅक्सचे अर्धे पैसे भरू शकली नाही. आयुष्यात पहिल्यांदाच मला टॅक्स भरायला विलंब झाला आहे. अशात सरकार उर्वरित टॅक्सवर व्याज आकरणार असेल, ती मी त्यांच्या निर्णयाचं स्वागतचं करते. आमच्यासाठीही हा कठिण काळ असून आपण सर्वजण मिळून या काळावर देखील मात करू शकतो.'

एक दिवसापूर्वीच कंगना रणौत आपल्या मुंबईच्या पाली हिल येथील ऑफिसची पाहाणी करण्यासाठी आली होती. याठिकाणी तिच्या ऑफिसच्या नूतनीकरणाचं काम सुरू आहे. गेल्या वर्षी बीएमसीने बेकायदा बांधकामाचं कारण देत कंगनाच्या या कार्यालयाची तोडफोड केली होती.

हे ही वाचा-अभिनेत्री नुसरत जहाने पती निखिल जैनशी नातं तोडलं, लग्नाबाबत केला मोठा खुलासा

अलीकडेच कंगना राणौत अभिनेता विक्रांत मेस्सीवर केलेल्या भाष्यामुळे चर्चेत आली होती. खरंतर काही दिवसांपूर्वी अभिनेत्री यामी गौतमने लग्न केलं आहे. अभिनेता विक्रांत मेस्सीने तिच्या विवाहाच्या फोटोची तुलना राधे माँशी केली होती. विक्रांत मेस्सीची ही टिप्पणी न आवडल्याने कंगनाने विक्रांत मेस्सीला लक्ष्य केलं होतं. तिने विक्रांतला 'कॉकरोच' असल्याचं म्हटलं होतं. तर आयुष्मान खुरानाने 'सिंपल आणि रिअल' म्हटल्यानंतर त्याच्यावरही कंगनाने तोंडसुख घेतलं होतं.

First published:

Tags: Bollywood actress, Kangana ranaut