मुंबई, 14 सप्टेंबर- शाहरुख खान(Shahrukh Khan) आणि दीपिका पादुकोण(Deepika Padukone) यांचा 'चेन्नई एक्प्रेस' (Chennai Express) हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 226.70 कोटींची कमाई केली होती. मात्र या सुपरहिट चित्रपटासाठी 'चेन्नई एक्प्रेस' नव्हे तर दुसऱ्या नावाचा विचार केला गेला होता. दिग्दर्शक रोहित शेट्टीने(Rohit Shetty) या चित्रपटासाठी दुसरं नाव ठरवलं होतं. पाहूया काय होत ते नाव.
View this post on Instagram
8 ऑगस्ट 2013 मध्ये 'चेन्नई एक्प्रेस' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. हा एक रोमँटिक कॉमेडी चित्रपट होता. रोहित शेट्टीने याचं दिग्दर्शन केलं होतं. तर गौरी खान, सिद्धार्थ रॉय कपूर आणि रोनी स्क्रूवाला हे या चित्रपटाचे निर्माता होते. या चित्रटातून शाहरुख खान आणि दीपिका पादुकोणच्या जोडीने धम्माल घातली होती. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. यातील गाणीसुद्धा मोठ्या प्रमाणात लोकप्रिय ठरली होती.
(हे वाचा;रश्मी देसाईचा ग्लॅमरस अवतार; Bigg Boss OTT मध्ये लागणार बोल्डनेसचा तडका)
मात्र रोहित शेट्टीने या चित्रपटासाठी एका वेगळ्या नावाचा विचार केला होता. रोहितला 'चेन्नई एक्प्रेस' हे नाव तितकसं पसंत नव्हतं. त्यांना या चित्रपटाचं नाव 'रेडी स्टेडी पो' असं ठेवायचं होतं. मात्र शेवटी 'चेन्नई एक्प्रेस' या नावानेच हा चित्रपट आपल्या समोर आला होता. आणि या रोमँटिक कॉमेडी चित्रपटाने पडद्यावर धम्माल केली होती.
(हे वाचा;PHOTOS: गौहर खानचा रॉयल अंदाज; लेहंग्यामध्ये दिसतेय खूपच सुंदर)
या चित्रपटामध्ये शाहरुख खान आणि दीपिका पादुकोणसोबत साऊथचे प्रसिद्ध अभिनेता निकेतन धीर, नचिकेत, प्रियामनी, मनोरमा अशी तगडी स्टारकास्ट होती. या चित्रपटातील तशी सर्वच गाणी सुपरडुपर हिट ठरली होती. मात्र 'लुंगी डान्स' हे गाणं खूपच हिट ठरलं होतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Deepika padukone, Shahrukh khan