दीपिकाला रणवीर तिच्या टाइपचा नव्हता वाटला!

दीपिका म्हणते, प्रेमात फक्त शारीरिक जवळीक जरुरी नसते. तर मनं जुळावी लागतात.

News18 Lokmat | Updated On: Oct 6, 2018 10:56 AM IST

दीपिकाला रणवीर तिच्या टाइपचा नव्हता वाटला!

मुंबई, 6 आॅक्टोबर : दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांच्या लग्नाची चर्चा जोरदार सुरू आहे. नुकताच त्यांनी त्यांची पहिली भेट कशी झाली, याचा किस्सा सुनावला. दोघंही हिंदुस्तान टाइम्सच्या एका कार्यक्रमात बोलत होते. लग्नाबद्दल बोलताना ते म्हणाले, जेव्हा असेल तेव्हा तुम्हाला सांगूच.

रणवीरचं पहिलं इम्प्रेशन कसं होतं? या प्रश्नावर दीपिका म्हणाली, ' त्याचा बँड बाजा बारात सिनेमा मी पाहिला होता. त्यावेळी माझा एजंट म्हणाला हा मोठा स्टार बनेल. पण मीच म्हटलं, मला नाही असं वाटत.'

एवढंच नाही, तर दीपिकानं सांगितलं, रणवीर तिच्या टाइपचा नाही. पण त्याचा अभिनय पाहून मी प्रभावित झालीय. त्यानं दिल्लीच्या मुलाचा अभिनय इतका तंतोतंत केला की मला माहीतच नव्हतं तो मुंबईचा आहे म्हणून.

दीपिका जेव्हा एका रेस्टाॅरंटमध्ये रणवीरला भेटली, तेव्हा तिनं त्याला विचारलं की तू मुंबईला शिफ्ट झालास का? त्यावेळी रणवीर आपल्या आई-वडिलांबरोबर डिनरला आला होता. दीपिकाला पाहून तो आईच्या कानात कुजबुजला, ही माझी आवडती हिराॅइन. मी हिचा फॅन आहे.

रणवीरच्या आधी दीपिका आणि रणबीर 2007मध्ये बचना ये हसीना सिनेमातून एकमेकांच्या जवळ आले होते. तिथून त्यांचं अफेअर सुरू झालं होतं. दीपिका म्हणते, मी रणबीरला रंगेहाथ पकडलं होतं. त्यानंतरच मी सर्व भावना बाजूला ठेवून वेगळं होण्याचा निर्णय घेतला.

Loading...

दीपिका म्हणते, प्रेमात फक्त शारीरिक जवळीक जरुरी नसते. तर मनं जुळावी लागतात. एकमेकांना समजून घ्यावं लागतं. पण सगळे असा विचार नाही करत.

दीपिकानं रणबीरच्या नावाचा टॅटूही काढला होता. आता दीपिका आणि रणवीर सिंग लग्न करतायत. तर दुसरीकडे रणबीर-आलिया डेटवर जातायत. लाईफ गोज आॅन, एवढं नक्की.

...म्हणून चक्क पृथ्वी शॉने रिषभच्या टी-शर्टमध्येच केक टाकला

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 6, 2018 10:53 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...