...म्हणून बिग बी वाढदिवस साजरा करणार नाहीत

...म्हणून बिग बी वाढदिवस साजरा करणार नाहीत

अख्खं बाॅलिवूड, त्यांचे फॅन्स त्यांचा वाढदिवस साजरा करायला सज्ज झालेत. पण बिग बी वाढदिवसाचं सेलिब्रेशन करायला तयारच नाहीत.

  • Share this:

मुंबई, 11 आॅक्टोबर : आज बाॅलिवूडचे शहेनशहा अमिताभ बच्चन . यांचा 76वा वाढदिवस. अख्खं बाॅलिवूड, त्यांचे फॅन्स त्यांचा वाढदिवस साजरा करायला सज्ज झालेत. पण बिग बी वाढदिवसाचं सेलिब्रेशन करायला तयारच नाहीत.

या वर्षी कृष्णा कपूर यांचं निधन झालंय. अमिताभ बच्चन यांची मुलगी श्वेताचे कपूर कुटुंब सासरचे नातलग आहेत. त्यामुळेच बिग बींनी वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतलाय. गेल्या वर्षी ऐश्वर्या राय बच्चनचे वडील गेल्यामुळे बिग बींनी 75वा वाढदिवस साजरा नव्हता केला.

यावेळी केबीसीच्या सेटवर मात्र अमिताभ बच्चन यांचा वाढदिवस जोरदार झाला. त्यावेळी अमिताभ भावुक झाले होते. त्यांच्या डोळ्यात अश्रू आले होते.

अमिताभ बच्चन यांनी 70, 80च्या काळात बऱ्याच अॅक्शन फिल्म्स केल्या. अगदी आताच्या सिक्स पॅकवाल्या अभिनेत्याला लाजवेल अशाच या अॅक्शन्स होत्या. अॅक्शनच्या वेळी सगळी इमोशन्स बिग बींच्या डोळ्यातून आणि शारीरभाषेतून बाहेर यायची.

सध्या अमिताभ बच्चन आणि आमिर खान 'ठग्ज आॅफ हिंदुस्थान' सिनेमा एकत्र करतायत. विजय कृष्णानं दिग्दर्शित केलेल्या या सिनेमात आमिर आणि आमिताभ यांना एकत्र बघणं हा एक वेगळा अनुभव ठरणार आहे. सिनेमा दिवाळीत रिलीज होईल.

सिनेमात आमिर आणि बिग बींच्या दरम्यान एक फाईट सीन आहे. आमिर तो स्वत:च करणार आहे. बिग बींसाठी डबल्स वापरू, म्हणजे दुसरा कुणा तो शाॅट देईल असं दिग्दर्शकानं म्हटलं. पण अमिताभना ते अजिबात मान्य नाही. ते स्वत:च तो सीन शूट करणार आहेत.

75 वर्षांचे बिग बी फाईट सीन करणार, याचं दिग्दर्शकाला आश्चर्यच वाटलं. अगदी आमिर खाननंही त्यांना समजावलं. उलट आमिरसोबत बिग बींनी मला तो सीन स्वत: करायचाय म्हणून वादही घातला. सिनेमात तो फाईटिंग सीन खूप महत्त्वाचा आहे. सिनेमाचा हायलाईटच आहे. त्यामुळेच बिग बींना तो स्वत: करायचाय.

'ठग्ज आॅफ हिंदुस्तान' 3डी आणि आयमॅक्समध्ये रिलीज होईल. तामिळ आणि तेलगूमध्येही सिनेमा पाहता येईल. 2018चा हा सर्वात मोठा सिनेमा ठरणार आहे.

76 वर्षांचे अमिताभ बच्चन आजही आहेत फिट... हे आहे रहस्य

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 11, 2018 10:42 AM IST

ताज्या बातम्या