Home /News /entertainment /

स्वरा भास्करच्या एक्स बॉयफ्रेंडनी केलं लग्न; बॉलिवूडच्या 2 प्रसिद्ध लेखकांचा आगळावेगळा विवाह

स्वरा भास्करच्या एक्स बॉयफ्रेंडनी केलं लग्न; बॉलिवूडच्या 2 प्रसिद्ध लेखकांचा आगळावेगळा विवाह

बॉलिवूडमध्ये सध्या यांच्या लग्नाचाी जोरदार चर्चा होत आहे. लग्नाचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

  मुंबई, 05 जानेवारी : बॉलिवूडमधील लग्नाचा ट्रेंड अजूनही कायम आहे. गेल्या वर्षी अनेक सेलिब्रिटींनी लग्न उरकून घेतली आता यंदाही अनेक सेलिब्रिटींची लग्न होणार आहेत. बॉलिवूडच्या 2 बड्या लेखकांनी एकमेकांशी लग्न केलं आहे. कनिका ढिल्लन (Kanika Dhillon) आणि हिमांशू शर्मा (Himanshu Sharma) यांचं नुकतंच लग्न पार पडलं आहे. 2020 च्या डिसेंबमध्ये त्यांचा साखरपुडा झाला होता. कनिकाने स्वत: तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन फोटो शेअर केले आहेत. त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. कनिका आणि हिमांशू हे दोघंही बॉलिवूडमधील आघाडीचे लेखक आहेत. हिमांशूने रांझना, तनू वेड्स मनू, झीरो अशा अनेक बिग बजेट सिनेमांचं लेखन केलं आहे. हिमांशूचा अतरंगी रे या सिनेमाचं सध्या शूटिंग सुरू आहे. यात अक्षय कुमार, सारा अली खान, धनुष यांसारखे बडे कलाकार काम करणार आहेत. हिमांशूला या सिनेमाकडून मोठ्या अपेक्षा आहेत. तर दुसरीकडे कनिकानेही मनमर्जिया आणि केदारनाथ यांसारख्या गाजलेल्या चित्रपटांचं लेखन केलं आहे.
  View this post on Instagram

  A post shared by Kanika Dhillon (@kanika.d)

  हिमांशू शर्मा आणि अभिनेत्री स्वरा भास्कर हे आधी एकमेकांशी रिशेनशीपमध्ये होते. काही कारणांमुळे ते वेगळे झाले. कनिका आणि हिमांशूने जून 2020 मध्ये त्यांच्या नात्याबद्दल जगाला माहिती दिली होती. गेल्याच महिन्यात त्यांचा साखरपुडा झाला होता.
  View this post on Instagram

  A post shared by Kanika Dhillon (@kanika.d)

  View this post on Instagram

  A post shared by Kanika Dhillon (@kanika.d)

  कनिका आणि हिमांशू दोघंही लेखक असल्यामुळे त्यांची जोडी आणि हा आगळावेगळा लग्नसोहळा बॉलिवूडमध्ये सध्या हिट ठरतो आहे.
  Published by:Amruta Abhyankar
  First published:

  Tags: Bollywood News

  पुढील बातम्या