मुंबई, 10 जून- बॉलिवूडमधील (Bollywood) एक असा चित्रपट जो लहांनांपासून वृद्धांपर्यंत सर्वांनाच परिचयाचा आहे. तो चित्रपट म्हणजे ‘सूर्यवंशम’ (Sooryavansham) होय. प्रत्येक रविवारी हा चित्रपट सेट मॅक्स या वाहिनीवर दाखवला जातो. त्यामुळे अशी क्वचितच एखादी व्यक्ती असेल ज्याने हा चित्रपट पहिला नसेल. या चित्रपटामध्ये अमिताभ बच्चन यांच्या नातू आणि मुलाची व्यक्तिरेखा साकारणारा एक बालकलाकार सुद्धा होता. तर हा बालकलाकार कोण होता? आणि तो सध्या काय करतो हे आज आपण जाणून घेणार आहोत.
तब्बल 20 ते 22 वर्षांपूर्वी आलेला ‘सूर्यवंशम’ हा चित्रपट आजही लोकांना लक्षात आहे. आणि तो सतत पाहिला देखील जातो. यामध्ये अमिताभ बच्चन यांनी बाप आणि मुलगा अशा दोन्ही भूमिका साकारल्या होत्या. तर त्यांच्या पत्नीची भूमिका दक्षिणात्य प्रसिद्ध अभिनेत्री सौंदर्या यांनी साकारली होती. आणि यामध्ये त्यांचा एक छोटा मुलगासुद्धा दाखवण्यात आला होता. जो नकळत विष असलेली खीर आजोबांना म्हणजेच अमिताभ बच्चन यांना खायला देतो. आणि या बापलेकामधला अबोला सुटतो.
(हे वाचा:बॉस लेडीच्या LOOK ची होतेय चर्चा; पाहा रुबिना दिलैकचा नवा PHOTOSHOOT )
तर हा छोटा मुलगा होता पीबीएस आनंद वर्धन. आनंद वर्धन हा साउथचे प्रसिद्ध पार्श्वगायक पीबी श्रीनिवास यांचा नातू आहे. पीबी श्रीनिवास हे एक प्रसिद्ध गायक होते. त्यांनी जवळपास 3000 गाणी गायिली आहेत. श्रीनिवास यांना वाटत होतं, की आपला नातवाने अभिनेता व्हावं. तसेच ते प्रसिद्ध गायक असल्यामुळे त्यांच्या घरी मनोरंजनसृष्टीतील दिग्गज लोकांचं सतत येजा असायचं. त्यामुळे आनंदला खुपचं कमी वयात काम करण्याची संधी मिळाली होती.
(हे वाचा:सचिन पिळगावकरांची ऑनस्क्रीन बहीण आज कशी दिसते? पाहा ती सध्या काय करते )
केवळ 4 वर्षांचा असताना त्याने ‘रामायणम’ या चित्रपटातून बालकलाकार म्हणून पदार्पण केल होतं. तर मात्र त्याला खरी प्रसिद्धी मिळाली ते ‘प्रियरागलू’ या त्याच्या दुसऱ्या चित्रपटाने. या चित्रपटासाठी त्याला ‘उत्कृष्ट बालकलाकाराचा नंदी पुरस्कार’ मिळाला होता. त्याने जवळजवळ 25 चित्रपटांत बालकलाकार म्हणून काम केल आहे.मात्र ‘सूर्यवंशम’ या चित्रपटाने त्याला प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली. या रोलसाठी तो आजही ओळखला जातो. मात्र वायच्या 13-14 वर्षी त्याने चित्रपटांपासून दूर जात शिक्षणावर लक्ष केंद्रित केल होतं.
आनंद वर्धन सध्या काय करतो?
सध्या त्याने दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये एक अभिनेता म्हणून पदार्पण केल आहे. त्याने अनेक चित्रपटसुद्धा केले आहेत. श्रुती हसन सारख्या मोठ्या अभिनेत्रींसोबतसुद्धा अभिनय केला आहे. आणि तो सध्या दाक्षिणात्य चित्रपटांमध्येच सक्रीय आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood News