मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

'रणवीर सिंहसारखी दिसतेयस...', Paparazzi च्या कमेंटवर आलियाने दिली अशी रिअ‍ॅक्शन; पाहा VIDEO

'रणवीर सिंहसारखी दिसतेयस...', Paparazzi च्या कमेंटवर आलियाने दिली अशी रिअ‍ॅक्शन; पाहा VIDEO

Bollywood Viral Video: अभिनेत्री आलिया भट्टचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Bollywood Viral Video: अभिनेत्री आलिया भट्टचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Bollywood Viral Video: अभिनेत्री आलिया भट्टचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मुंबई, 26 ऑगस्ट: बॉलिवूड सेलिब्रिटींचं (Bollywood Celebrity) खासगी जीवन हा चाहत्यांसाठी कायमच कुतुहलाचा विषय असतो. हे सेलिब्रिटी त्यांच्या ऑफ-स्क्रीन (Off Screen lifestyle of bollywood celebrity) आयुष्यात कसे राहतात, कसे वागतात, काय बोलतात, कशावर आणि कशी प्रतिक्रिया देतात याबद्दल चाहत्यांना उत्सुकता असते. पूर्वीच्या काळी सोशल मीडिया नसल्यामुळे हे कुतूहल आणखी मोठ्या प्रमाणावर असायचं. आताच्या काळात ते कुतूहल कमी झालं नसलं, तरी सोशल मीडियामुळे चाहत्यांना सेलेब्रिटींच्या खासगी आयुष्यातले फोटो-व्हिडीओ सहज पाहता येतात. चाहत्यांना बॉलिवूड सेलेब्रिटींचे असे फोटो-व्हिडीओ उपलब्ध करून देण्यासाठी पापाराझी सतत प्रयत्नशील असतात. अभिनेत्री आलिया भट्टचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. बॉलिवूडपॅप या इन्स्टाग्राम पेजवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. हे वाचा-OMG! डान्स करता करता सर्वांसमोरच बदलले अंगावरील कपडे; अभिनेत्रीचा VIDEO VIRAL अभिनेत्री आलिया भट (Alia Bhatt) अलीकडेच मुंबईच्या विमानतळावर Paparazzi ना दिसली. तिने मास्क परिधान केलेला होता. तरीही तिच्याभोवती पापाराझींची गर्दी जमली. त्या वेळी शूट केलेला व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. आलियाने ट्रॅक पँट, व्हाइट टॉप आणि जॅकेट असा वेश केला आहे. तिच्या डोक्यावर टोपीही आहे. त्या टोपीमुळे पापाराझींपैकी कोणाला तरी तिचा बॉयफ्रेंड रणबीर कपूरची आठवण झाली. त्या कॅपमुळे ती रणबीर कपूरसारखी दिसत असल्याचं त्या पापाराझीला आलियाला सांगायचं होतं. प्रत्यक्षात मात्र बोलताना त्याची गडबड झाली आणि तो रणबीर कपूरऐवजी (Ranbir Kapoor) रणवीर सिंह (Ranveer Singh) असं म्हणाला. 'तुमचा लूक रणवीर सिंहसारख्या दिसत आहे,' असं वाक्य फोटोग्राफरच्या तोंडून निघाल्यावर आलिया एकदम आश्चर्यचकित झाली. काही सेकंदं काहीच न बोलल्यानंतर ती हसली आणि 'रणवीर सिंह?' असा प्रतिप्रश्न तिने केला. त्यावर रणबीर कपूर अशी दुरुस्ती त्या फोटोग्राफरने केली. हा सर्व संवाद कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
अवघ्या काही सेकंदांचा हा व्हिडीओ शेअर झाल्यानंतर नऊ तासांमध्ये सव्वा लाखाहून अधिक व्ह्यूज त्याला मिळाले आहेत. या व्हिडीओवर लाइक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडत आहे. आलियाच्या 'जाके सो जाओ..' या शेवटच्या वाक्यावर तर चाहते विशेष कमेंट्स करत आहेत.
Published by:Janhavi Bhatkar
First published:

Tags: Alia Bhatt, Ranbir kapoor, Ranveer singh

पुढील बातम्या